
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढील आठवड्यात सांगलीच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते राजारामबापू शिक्षण व उद्योग समूहाला भेट देणार आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भा
.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवारांचे 40 आमदार त्यांच्यासोबत गेले होते. तेव्हापासून ते सातत्याने शरद पवारांना झटके देत आहेत. विशेषतः शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही त्यांच्या पक्षात जाण्याची चर्चा सुरू आहे. पण आता पाटील हे राष्ट्रवादीच्या नव्हे तर भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येत्या 17 तारखेला सांगलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते इस्लामपूर येथील राजारामबापू शिक्षण व उद्योग समूहाला भेट देणार आहेत. तसेच कासेगाव शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एका अद्ययावत इमारतीचे उद्घाटन करणार आहेत.
विशेष म्हणजे 16 फेब्रुवारी रोजी जयंत पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यामु्ळे गडकरी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. या संभाव्य भेटीमुळे जयंत पाटील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सांगलीसह संपूर्ण राज्यात सुरू झाली आहे. राजारामबापू हे पूर्वी जनता पक्षात होते. त्यांनी या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पदही भूषवले होते. जयंत पाटील हे त्यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे जयंत पाटील भाजपमध्ये गेले तर आश्चर्य वाटायला नको असे यासंबंधी सांगितले जात आहे.
शरद पवार गटात प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा
उल्लेखनीय बाब म्हणजे जयंत पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवले. पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाची प्रचंड हाराकिरी झाली. विशेषतः जयंत पाटील यांचे मताधिक्यही 70 हजारांहून 13-14 हजारांपर्यंत खाली घसरले आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्या जागी नवा प्रदेशाध्यक्ष देण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे. पण या चर्चेवर जयंत पाटील यांचे कार्यकर्ते व राजारामबापू शिक्षण व उद्योग समूहातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून याविषयी कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
हे ही वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.