
Maharashtra Health News: राज्याच्या आरोग्य विभागाचं आणि सर्वसामान्यांचंही टेन्शन वाढवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. धुळे जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट मोडवर आली आहे. हा रुग्ण सौदी अरेबियातून धुळ्यात आला. त्वचेसंबंधित त्रास जाणवू लागल्याने त्याला तातडीने धुळे शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे या रुग्णाच्या तीन रक्त चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांच्या अहवालातून त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
डॉक्टरांनी काय माहिती दिली?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्ण 2 ऑक्टोबर 2025 रोजी सौदी अरेबियातून धुळ्यात आला. मात्र, त्यानतंर त्वचेसंबंधित त्रास जाणवू लागल्याने त्याला धुळ्यातील भाऊसाहेब हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुण्यातील एनआयए प्रयोगशाळेने या चाचण्यांचा अहवाल दिल्यानंतर त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या दोघांचाही अहवाल निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्स संक्रमित रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
काय आहे हा आजार?
मंकीपॉक्स (आता अधिकृतपणे एम्पॉक्स किंवा म्पॉक्स म्हणून ओळखले जाते) साथ जभरात सुरु आहे. मात्र 2022 मधील सुरुवातीच्या महामारीप्रमाणे सध्या ही साथ थैमान घालत नसून नियंत्रणात असली तरी रुग्णसंख्या चिंतेत टाकणारी आहे. ही साथ सुरू झाली 2022 मध्ये मे महिन्यात सुरु झाली आणि आजपर्यंत 122 देशांमध्ये एका लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. विशेषतः आफ्रिकेत, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (DRC) मध्ये मंकीपॉक्सने बाधितांची संख्या वाढत आहे. 2023-2025 दरम्यान 29 हजारांहून अधिक रुग्ण आफ्रिकेत सापडले असून यापैकी 800 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर मृत्यूदर सुमारे 3 टक्के इतका आहे. ऑगस्ट 2025 मध्ये जगभरात 59 देशांमध्ये 3780 नवीन प्रकरणे समोर आली असून 15 मृत्यू नोंदवले गेले आहेत.
भारतातील स्थिती काय?
भारतात या संसर्गाचा धोका कमी आहे. 2024-2025 दरम्यान 10 क्लॅड आयबी प्रकरणे नोंदवली गेली आहेत. डिसेंबर 2024 ते मार्च 2025 दरम्यान हे रुग्ण आढळून आले असून बहुतेक गल्फ देशांशी प्रवासाशी संबंधित प्रकरणं होती. ऑक्टोबर 2025 पर्यंत भारतात या संसर्गाची एकूण 30 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मात्र सुदैवाने या साथीचा भारतात सामुदायिक प्रसार झालेला नाही. सरकार सध्या जगभरामध्ये या आजाराचे रुग्ण वाढत असल्याने परिस्थितीवर विशेष लक्ष ठेवून आहे.
लक्षणे आणि प्रतिबंध काय?
लक्षणे:
त्वचेवर पुरळ, ताप, डोकेदुखी, थकवा जाणवतो. सामान्यतः लक्षणं 2 ते 4 आठवडा टिकतात.
प्रतिबंध:
वारंवार हात धुणे, रोगग्रस्त व्यक्तींपासून अंतर ठेवणे, लसीकरण (JYNNEOS लस उपलब्ध आहे). परदेशी प्रवास करताना सावधगिरी बाळगणे फायद्याचे ठरते. खास करुन आफ्रिकेला जाणाऱ्यांनी काळजी घ्यावी.
जागतिक आरोग्य संघटनेनं ऑगस्ट 2024 मध्ये पुन्हा सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली, पण तुलनेनं कमी रुग्ण आढळून आल्याने या आणीबाणीची तीव्रता कमी करण्यात आलीये.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.