
Navratri : महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सव कुणी साजरा केला असा प्रश्न अनेकांना पडला असेल. आज आपण या नवरात्रोत्सावाला नेमकी कुणी सुरुवात केली आणि त्या मागचा इतिहास काय होता हे जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्राच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला हे सगळ्यांनाच माहितेय. मात्र सार्वजनिक नवरात्रोत्सव कुणी सुरू केला याबद्दल फारसं कुणाला माहित नाही. महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सव बाळासाहेब ठाकरे यांचे पिता प्रबोधनकार ठाकरे यांनी 1926 साली सुरु केला. बहुजनांनाही पूजेचा मान मिळावा म्हणून प्रबोधनकारांनी या नवरात्रोत्सवाला सुरु केली. या नवरात्रोत्सवाच्या सीमोल्लंघनाच्या मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संबोधितही केलं होतं.
सुरुवातीला तेव्हाचं काळं मैदान म्हणून ओळखल्या जाणा-या मोकळ्या जागेत त्यांनी नवरात्रोत्सव साजरा केला. आणि कालांतराने हा उत्सव दादच्या खांडके चाळीत स्थलांतरित झाला. या खांडके चाळीत हा उत्सव आजही तेवढ्याच उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जातोय.
कसा आहे नवरात्रोत्सवा इतिहास?
1929 पर्यंत हा उत्सव प्रबोधनकारांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहिला. त्यानंतर ही परंपरा दादरमधील खांडके चाळीतील रहिवाशांनी आजवर जपलीये. ज्या उद्देशानं प्रबोधनकार ठाकरेंनी नवरात्रोत्सव साजरा केला. तोच उद्देश दादर पश्चिम विभाग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने आजही कायम ठेवलाय. आता हा उत्सव खांडके चाळीतील तरुण पिढी साजरी करतेय. प्रबोधनकारांनी सुरु केलेला हा उत्सव असाच अविरत शिस्तबद्ध पद्धतीने सुरू ठेवणार असं या तरुण पिढीने सांगितलंय.
खांडके चाळीतील या देवीच्या दर्शनासाठी आजवर अनेक राजकीय नेते मंडळी, कलाकार येऊन गेलेत. ज्या कलाकारांनी या नवरात्रोत्सवात आपली कला सादर केली. ते कलाकार आज यशाच्या उंच शिखरावर आहेत.
FAQ :
महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्रोत्सव कुणी सुरू केला?
उत्तर: महाराष्ट्रातील सार्वजनिक नवरात्रोत्सव प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे (बाळासाहेब ठाकरेंचे वडील) यांनी १९२६ साली सुरू केला. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला हे प्रसिद्ध आहे, पण नवरात्रोत्सवाची ही परंपरा प्रबोधनकारांनी सुरू केली.
नवरात्रोत्सवाची सुरुवातीची जागा कुठे होती आणि नंतर काय झाले?
उत्तर: सुरुवातीला तेव्हाच्या काळा मैदान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोकळ्या जागेत हा उत्सव साजरा केला गेला. कालांतराने हा उत्सव दादरमधील खांडके चाळीत स्थलांतरित झाला, आणि आजही तिथेच तेवढ्याच उत्साहाने साजरा केला जातो.
प्रबोधनकार ठाकरेंनंतर हा उत्सव कसा चालू राहिला?
उत्तर: १९२९ पर्यंत प्रबोधनकारांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव सुरू राहिला. त्यानंतर दादरमधील खांडके चाळीतील रहिवाशांनी ही परंपरा जपली. सध्या दादर पश्चिम विभाग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाने प्रबोधनकारांचा उद्देश कायम ठेवून हा उत्सव साजरा करतो. आता तरुण पिढी शिस्तबद्ध पद्धतीने हा उत्सव चालवते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.