
Mumbai Ahmedabad Bullet Train Project : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. शीळफाटा ते घणसोली हा 5 किलोमीटर लांबीच्या बोगद्याचं काम पूर्ण झाले आहे. बुलेट ट्रेन हा भारतातील सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प आहे. भारतातील पहिला 508 किमी लांबीचा बुलेट ट्रेन कॉरिडॉर मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बांधला जात आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या चाचण्या 2026 मध्ये सुरू होणार आहेत. मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पात एकूण 12 स्थानके आहेत. त्यापैकी चार मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर महाराष्ट्रात आहेत. ठाणे, कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेन स्थानकाशी जोडणार आहे.
मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेन मार्गावर ठाणे जिल्ह्यातले म्हातार्डी रेल्वे स्थानक ठाणे, कोपर रेल्वे स्थानक तसेच तळोजा मेट्रोला कसे व्यवस्थित जोडता येईल हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. आज एमएसआरडीसी कार्यालयात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, महारेल तसेच हायस्पीड रेल्वेचे अधिकारी देखील उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यात बुलेट ट्रेनचे स्थानक दिवाजवळ म्हातार्डी येथे उभारले जात आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील हे महत्त्वाचे जंक्शन असेल. पुढे चालून हे स्टेशन एकात्मिक वाहतूक केंद्र बनेल. हे स्थानक बुलेट ट्रेनसह रेल्वे, मेट्रो, बस आणि महामार्ग यांना जोडेल. महारेल ने यासंदर्भात एक विस्तृत आरेखनाचे सादरीकरण केले. यामध्ये म्हातार्डी स्थानक हे ठाणे रेल्वे स्थानक, कोपर तसेच तळोजा मेट्रो यांना कसे जोडता येऊ शकेल याचे संकल्पचित्र होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात हायस्पीड रेल्वे प्रधीकारानास हा प्रस्ताव त्यांच्या माध्यमातून राबवता कसा येईल हे पाहण्याच्या सूचना दिल्या हायस्पीड रेल्वे प्रधीकार्णाने यावर सकारात्मक भूमिका घेतली असून हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला पाठवण्यास मान्यता दिली आहे. अशा रीतीने हे बुलेट ट्रेन स्थानक जोडले गेल्यास ठाणे रेल्वे स्थानक, कोपर तसेच नवी मुंबईतील तळोजा येथील मेट्रो स्थानक येथून प्रवाशांना सहजपणे म्हातार्डी येथे येता येईल.
FAQ
1 मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील नवीनतम टप्पा कोणता पूर्ण झाला आहे?
शीळफाटा ते घणसोली हा ५ किलोमीटर लांबीचा बोगदा पूर्ण झाला आहे. हा प्रकल्प भारतातील सर्वात महत्वाकांक्षी आहे आणि भारतातील पहिला ५०८ किमी लांबीचा बुलेट ट्रेन कॉरिडॉर मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बांधला जात आहे.
2 बुलेट ट्रेनच्या चाचण्या कधी सुरू होणार आहेत?
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या चाचण्या २०२६ मध्ये सुरू होणार आहेत. या प्रकल्पात एकूण १२ स्थानके आहेत, ज्यातील चार महाराष्ट्रात आहेत: मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर.
3 ठाणे, कोपर रेल्वे स्थानकाला बुलेट ट्रेनशी कसे जोडले जाणार आहे?
ठाणे जिल्ह्यातील म्हातार्डी रेल्वे स्थानक, ठाणे, कोपर रेल्वे स्थानक आणि तळोजा मेट्रोला बुलेट ट्रेन स्थानकाशी व्यवस्थित जोडण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. हे स्थानक दिवाजवळ म्हातार्डी येथे उभारले जात आहे आणि ते एकात्मिक वाहतूक केंद्र बनेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.