
महाराष्ट्रात 39 लाख मतदार अचानक तयार झाले. हे फ्लोटिंग अर्थात फिरते मतदार असून, ते आता महाराष्ट्रानंतर प्रथम बिहार व नंतर उत्तर प्रदेशात जातील. निवडणूक जिंकण्याचा हा एक नवा पॅटर्न या देशात तयार झाला आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे
.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील कथित मतदार घोटाळ्यासंबंधी काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक अनियमितता झाल्याचा आरोप केला. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी उपरोक्त आरोप केला.
आम्ही डोके फोडले, पण निवडणूक आयोग जिवंत नाही
संजय राऊत म्हणाले, राहुल गांधी यांनी देशापुढे अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. या देशाचा निवडणूक आयोग जिवंत असेल, त्यांची ईमानदारी कायम असेल, तर त्यांना राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यावे लागेल. पण निवडणूक आयोग उत्तर देणार नाही हे आम्हाला ठावूक आहे. कारण, निवडणूक आयोग ज्यांचे सरकार आले आहे, त्यांची गुलामगिरी करत आहे. आम्ही या प्रकरणी वारंवार महाराष्ट्र किंवा केंद्रीय निवडणूक आयोगापुढे आमचे डोके फोडले, पण आयोग जिवंत नाही हे दिसून आले.
39 लाख फ्लोटिंग मतदार आता बिहारला जातील
महाराष्ट्रात 39 लाख मतदार अचानक आले. हे मतदार कुठून आले माहिती नाही. पण आता ते बिहारला जातील. हे फ्लोटिंग (फिरते) मतदार आहेत. त्यांची नावे, आधार कार्ड आदी सर्वकाही तेच राहतील. पण ते फिरत राहतील. त्यापैकी काही मतदार दिल्लीत आलेत. आम्हाला इथेही महाराष्ट्र पॅटर्न दिसून आला. आता हे 39 लाख मतदार प्रथम बिहार व त्यानंतर उत्तर प्रदेशला जातील.
ECने सरकारने टाकलेले कफन झटकून उठावे
हा एक नवा पॅटर्न येथे तयार झाला आहे. याच पॅटर्नवर हे लोक निवडणूक लढतात व जिंकतात. त्यामुळे आम्ही राहुल गांधी यांच्या नेतृत्वात उपस्थित केलेला प्रश्न अत्यंत गंभीर व महत्त्वाचा आहे. या देशात लोकशाही जिवंत ठेवायची असेल, संसद व विधानसभा जिवंत ठेवायची असेल तर या प्रश्नाचे उत्तर मीडिया व जनतेने विचारले पाहिजे. आम्ही तर लढणारे लोक आहोत. आम्ही यापुढेही लढतच राहू. पण महाराष्ट्रात आम्हाला ज्या पद्धतीने हरवण्यात आले हा फार गंभीर प्रश्न आहे. राहुल गांधी यांनी आता हा मुद्दा देशापुढे उपस्थित केला आहे. मी निवडणूक आयोगालाही आवाहन करेन की, त्यांनी आपल्या अंगावर सरकारने टाकलेले कफन झटकून टाकून उठावे व या प्रश्नांचे उत्तर द्यावे, असे संजय राऊत म्हणाले.
सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला मारकडवाडीचा मुद्दा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावेळी मारकडवाडीचा मुद्दा उपस्थित करत निवडणूक आयोगाच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आमच्या पक्षाचे आमदार उत्तम जानकर माळशिरस विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेत. त्यांनी आपल्या जेवढी मते मिळायला हवीत, तेवढी मते मिळाली नसल्याचा आरोप केला आहे. त्यांची निवडून येऊनही पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची इच्छा आहे. विशेषतः मनसेच्या एका उमेदवाराला त्याचे स्वतःचेही मत पडले नाही. अशा अनेक गंभीर गोष्टी या निवडणुकीत घडल्या आहेत. त्यामुळे अनेक नेत्यांनी व पक्षांनी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. हा सर्व डेटा सार्वजनिक आहे. आम्ही या प्रकरणी केवळ निष्पक्षतेची मागणी करत आहोत, असे त्या म्हणाल्या.
हे ही वाचा…
राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप:महाराष्ट्राची प्रौढ लोकसंख्या 9.54 कोटी तर 9.7 कोटी मतदार कसे?
नवी दिल्ली – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार यादीत अनियमितता झाली असल्याचा आरोप लोकसभेतील काँग्रेसची विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे. या संदर्भात राहुल गांधी, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आम्हाला अनेक अनियमित आढळल्या असल्याचे यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले. निवडणूक आयुक्त निवडण्याची पद्धत देखील सरकारने बदलली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.