
Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणत खळबळजनक ट्विस्ट येणार आहे. राज्यात सध्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे असे दोन उप मुख्यमंत्री आहेत. अशातच आता महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल नेत्याचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आले आहे.
नाशिकच्या पालकमंत्रिपदासंदर्भात बोलताना गिरीश महाजन यांनी एक मोठं विधान केले आहे. पालकमंत्रीच काय फडणवीस शिंदे, अजित पवारांनंतर तिसरा उपमुख्यमंत्री देखील करू शकतात असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला टोला लगावला आहे.
भाजप आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केलेलं एक विधान केले आहे. त्यांच हे विधान चांगलंच चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं तर ते भुजबळांना तिसरे उपमुख्यमंत्री देखील करू शकतात असं विधान गिरीश महाजन
यांनी केले आहे.
दरम्यान यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय. भाजप गद्दारांसाठी घटना दुरुस्ती करून अनेक मुख्यमंत्री देखील करू शकतं असा टोला संजय राऊतांनी लगावला. नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तोडगा कधी निघणार असा प्रश्न सर्वांनाचा पडलाय. रायगडनंतर आता नाशिकच्या पालकमंत्रिपदाची चर्चा देखील जोर धरू लागलीय.. भुजबळांच्या एन्ट्रीनंतर त्यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्रिपद जाणार अशी चर्चा सुरू आहे. मात्र, पालकमंत्रिपदावर मुख्यमंत्रीच निर्णय घेणार असं संजय शिरसाट यांनी म्हटल आहे.
पालकमंत्री कोण होणार याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेणार. नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी राजकीय वर्तुळात भुजबळांच्या नावाची चर्चा सुरूय. मात्र, दुसरीकडे पालकमंत्रिपदाच्या रेसमध्ये नसल्याचं स्वत: भुजबळांनी म्हटलंय.. झी 24 तासच्या टू द पॉईंट
या कार्यक्रमात भुजबळांनी हे विधान केलंय.
पालकमंत्रिपदाचा मी दावेदार नाही, जो होईल त्याला सरकार्य करणार. नाशिकच्या पालकमंत्रिपदावर विचारलेल्या प्रश्नानंतर गिरीश महाजन यांनी केलेलं विधान चांगलंच चर्चेत आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून गिरीश महाजन देखील नाराज आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तसंच नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार, याकडे देखील आता लक्ष लागल आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.