
महाराष्ट्र काँग्रेसने बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. त्यात त्यांनी फडणवीसांचा उल्लेख महाराष्ट्रद्रोही अनाजीपंत असा करत त्यांच्या काही मंत्र्यांचे व नेत्यांचे फोटो पोस्ट केलेत. या सर्वांचा त्यांनी आका, कॅन्टीन
.
महायुती सरकार गत काही दिवसांपासून आपल्या नेत्यांच्या व मंत्र्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे सातत्याने वादात अडकले आहे. सुरूवातीला मंत्री नीतेश राणे यांनी वादग्रस्त विधाने करून सरकारला अडचणीत आणले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यापुढे जय गुजरात म्हणून सरकारच्या अडचणी वाढवल्या. त्यानंतर शिंदेंच्याच नेतृत्वातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विधानभवनातील कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण करून आपला हात साफ करून घेतला. हे कमी की काय म्हणून त्यानंतर लगेचच मंत्री संजय शिरसाट यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला.
या व्हिडिओत संजय शिरसाट आपल्या बेडरूममध्ये पैशांच्या बॅगेसोबत बसल्याचे दिसून येत आहे. त्यांचा हा व्हिडिओ समोर येताच विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. यामुळे सरकारचा पुरता गोंधळ उडवला. हा वादाचा क्रम इथेच थांबला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमी खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल केला. यावरूनही सरकारला सध्या रोज टीकेचे धनी व्हावे लागत आहे. विशेष म्हणजे कोकाटे यांच्या यापूर्वीच्या काही विधानांमुळेही सरकारची चांगलीच गोची झाली होती.
कुणाचा काय म्हणून केला उल्लेख?
या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र काँग्रेसने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संजय गायकवाड, नीतेश राणे, गोपीचंद पडळकर, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे व संजय शिरसाट यांचे काही फोटो ट्विट केलेत. या फोटोत काँग्रेसने फडणवीस यांचा उल्लेख महाराष्ट्रद्रोही अनाजीपंत व त्यांची अनमोल रत्ने असा केला आहे. तर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख जय गुजरात म्हणून केला आहे.
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना कॅन्टीन केसरीची उपमा देण्यात आली आहे. नीतेश राणे यांचा उल्लेख सामाजिक तेढ वाढवणारा, लोकशाहीपेक्षा मनगटशाहीवर विसंबून असणारा नेता म्हणून करण्यात आला आहे. याशिवाय गोपीचंद यांचा उल्लेख विधानभवनाची प्रतिमा मलीन करणारा नेता म्हणून करण्याता आला आहे. एवढेच नाही तर काँग्रेसने धनंजय मुंडे यांचा उल्लेख आका, माणिकराव कोकाटे यांचा उल्लेख रम्मी मास्टर व मंत्री संजय शिरसाट यांचा उल्लेख खोकेबाज म्हणून केला आहे. काँग्रेसच्या या टीकेची सोशल मीडियात खमंग चर्चा रंगली आहे.
हे ही वाचा…
रोहित पवार पुन्हा कृषिमंत्र्यांवर बरसले:म्हणाले – इंटरपोलद्वारे चौकशी केली तरी कोकाटे सभागृहात पत्ते खेळत होते हे सत्य बदलणार नाही
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी बुधवारी पुन्हा एकदा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सभागृहात ऑनलाईन पत्ते खेळण्याप्रकरणी निशाणा साधला आहे. या प्रकरणी सीआयडी आणि सीबीआयच नव्हे तर थेट इंटरपोलच्या माध्यमातून चौकशी केली तरी कृषिमंत्री सभागृहात पत्ते खेळत होते हे सत्य बदलणार नाही, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.