digital products downloads

महाराष्ट्र सरकारमुळे अभिनेता प्रभासच्या मेहुण्याने स्वत:ला संपवलं; 40 कोटींचं हे प्रकरण काय?

महाराष्ट्र सरकारमुळे अभिनेता प्रभासच्या मेहुण्याने स्वत:ला संपवलं; 40 कोटींचं हे प्रकरण काय?

Actor Prabhas Relative Ends Life: महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या चर्चेत असतानाच आता सरकारी कंत्राटदारांच्या आत्महत्येचा सलग दुसरी घटना राज्यात घडली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदाराने सोमवारी कर्जाबाजारीपणामधून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 40 कोटींहून अधिक सरकारी बिल थकल्याने या कंत्राटदाराने टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्वत:ला संपवणारी ही व्यक्ती दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा नातेवाईक आहे.

Add Zee News as a Preferred Source

कोण आहे हा कंत्राटदार?

कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वत:ला संपवणाऱ्या या कंत्राटदाराचं नाव पनमाचा वेंकटेश्वर वर्मा उर्फ मुन्ना वर्मा असं आहे. महाराष्ट्रामध्ये सरकारी कंत्राटदारांच्या थकबाकीचा प्रश्न दिवसोंदिवस गंभीर होत चालेला असतानाच 61 वर्षीय मुन्ना यांच्या आत्महत्येनं या चिंतेत अधिक भर घातली आहे. अनेक कंत्राटदार वाढत्या कर्जाच्या बोजामुळे नैराश्येत असल्याचं दिसत आहे. वर्मा हे श्री साई असोसिएट्स नावाच्या कंपनीच्या माध्यमातून सरकारी कंत्राटं घेऊन काम करायचे. अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांची काम सुरु होती. देयकं थकल्याने ते आर्थिक संकटात होते.

मित्राला दिसला लटकणारा मृतदेह

नागपूरमधील राजगनर येथील फ्लॅटमध्ये ते एकटे राहायचे. त्यांचे कुटुंबीय हैदराबादमध्ये वास्तव्यास होते. सोमवारी सकाळी वर्मा यांनी राहत्या घरी गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. वर्मा यांचे मित्र महेश बियाणी हे त्यांना भेटल्यासाठी आले असता त्यांना मित्राचा मृतदेह त्याच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. बियाणी यांनी तातडीने पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. वर्मा यांच्यावर मंगळवारी सकाळी मनकापूर येथील घटावर अंत्यंसंस्कार करण्यात आले.

अभिनेता प्रभासचा मेहुणा

वर्मा हे अभिनेता प्रभासचे मेहुणे होते. वर्मा हे प्रभासची पत्नी अनुराधाचे मामेभाऊ होते. वर्मा यांचे आजोबा 1962 साली व्यावसायानिमित्त रामटेकला आले होते. वर्मा हे सार्वजनिक बांधकामाचे ठेकेदार होते. नागपूरसह गोंदिया आणि विदर्भातील वेगवेगळ्या भागांत त्यांची सरकारी कामे सुरू होती. मात्र तब्बल 40 कोटींची थकबाकी मिळण्याबाबत सरकार आणि प्रशासनाकडून काहीच आशेचा किरण दिसत नसल्याने त्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागले.

जुलैमध्ये हर्षल पाटील नावाच्या कंत्राटदारानेही केलेली आत्महत्या

जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यातील हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने सरकारकडे थकलेले एक कोटी 40 लाख रुपये वारंवार मागणी करूनही मिळत नसल्याने आपले जीवन संपविले होते. आता नागपुरात त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. सांगलीचे हर्षल पाटील हे ‘जलजीवन मिशन’ या सरकारने गाजावाजा केलेल्या योजनेचे कंत्राटदार होते.

FAQ

महाराष्ट्रात कंत्राटदारांच्या आत्महत्येच्या घटना का घडत आहेत?
महाराष्ट्रात सरकारी कंत्राटदारांना त्यांच्या कामाची थकबाकी (बिले) वेळेवर मिळत नसल्याने आर्थिक संकट आणि कर्जबाजारीपणा वाढत आहे. यामुळे काही कंत्राटदार नैराश्येत जाऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत.

नागपुरातील कंत्राटदाराची आत्महत्या कोणत्या कारणामुळे झाली?
नागपूरमधील कंत्राटदार पनमाचा वेंकटेश्वर वर्मा उर्फ मुन्ना वर्मा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडील सुमारे 30 ते 40 कोटींची थकबाकी आणि कर्जाच्या वाढत्या दबावामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली.

हा कंत्राटदार होता तरी कोण?
पनमाचा वेंकटेश्वर वर्मा उर्फ मुन्ना वर्मा हे 61 वर्षीय कंत्राटदार होते, जे श्री साई असोसिएट्स या कंपनीच्या माध्यमातून सरकारी कंत्राटे घेऊन काम करत होते. त्यांची कामे नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये सुरू होती.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp