
Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिला किर्तनकाराच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. सध्या महाराष्ट्रात आषाढी वारीचा उत्साह सुरू असताना महिला किर्तनकाराचा खून करण्यात आल्याच्या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर रोड येथे असणाऱ्या मोहटादेवी आश्रमामध्ये राहणाऱ्या ह. भ. प. संगीताताई महाराज यांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येतेय. आश्रमातच संगीताताई महाराज यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी आरोपी कोण आहे. व ही हत्या का करण्यात आली, याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करण्यात येतोय.
(सविस्तर वृत्त लवकरच)
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.