
सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून तात्पुरत्या स्वरुपात आणि त्वरित वीजजोडणीची सुविधा उपलब्ध् केली आहे. या जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी अधिकृत वीजपुरवठा घेऊनच गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन वीज कंपनीचे नांदेड पर
.
सध्या सार्वजनिक गणेश मंडळांकडून गणेशमूर्ती स्थापनेची तयारी सुरु झाली आहे. यामध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांकडून अनधिकृतरीत्या वीजपुरवठा घेतला जात असल्याचे चित्र आहे. वीज वाहिनीवर आकडे टाकून विज पुरवठा घेतल्यामुळे अनेक वेळा अपघाताची शक्यता निर्माण होते. सदर प्रकार टाळण्यासाठी गणेश मंडळांना घरगुती वीज दरानुसार वीज जोडणी देण्याचा निर्णय वीज कंपनीने घेतला आहे.
त्यानुसार गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीज जोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्था मंडप परवानगी, पोलिस स्थानक परवाना, विद्युत निरीक्षक यांचे वीजसंच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी चाचणी अहवाल व राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक छायांकित प्रत इत्यादी कागदपत्रांसह नजीकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधणे आवश्यक आहे.
गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचा वीज अपघात होऊ नये यासाठी मंडप, रोषणाई व देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्च दाब विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे ई. यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे. मंडपातील वीजसंच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मंडपातील वीजसंच मांडणी मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांकडून करुन घेण्यात यावी.
गणेश मंडळांनी विद्युत सुरक्षा उपाययोजनांमध्ये तडजोड करु नये. आपत्कालीन स्थितीकरिता कार्यक्षेत्रातील महावितरणच्या शाखा अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत. याबरोबरच महावितरणच्या स्थानिक नियंत्रण् कक्षाचे 7875473980 (नांदेड मंडळ), 7875476326 (परभणी मंडळ) आणि 7875447143 (हिंगोली मंडळ) क्रमांक ग्राहकांच्या सेवेत २४ तास उपलब्ध आहेत. या सोबतच 18001023435, 18002333435 व 1912 या टोलफ्री क्रमांकांवरही संपर्क साधता येईल. अशी माहिती मुख्य अभियंता माने यांनी दिली आहे.
तात्पुरत्या वीजजोडणीसाठी गणेश मंडळांना मंजूर वीजभारानुसार अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. ही रक्कम ऑनलाईन भरल्यास गणेशोत्सव संपल्यानंतर वीज बिलाची रक्कम वगळून उरलेली रक्कम विनाविलंब परत केली जाईल. त्यामुळे गणेश मंडळांनी अनामत रक्कम ऑनलाईन पध्दतीनेच भरावी, असे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.