digital products downloads

महिलांची तक्रार: अशोक खरातचा पाय खाेलात; आणखी दाेन गुन्हे झाले दाखल, एकूण संख्या सहा, आज नेणार काेर्टात – Nashik News

महिलांची तक्रार:  अशोक खरातचा पाय खाेलात; आणखी दाेन गुन्हे झाले दाखल, एकूण संख्या सहा, आज नेणार काेर्टात – Nashik News



भोंदू कॅप्टन अशोक खरातविरोधात तक्रारदार महिलांची संख्या वाढत असून रविवारी रात्री २ महिलांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार कॅनडा कॉर्नर येथील ओकस प्रॉपर्टी कार्यालयात या दोन्ही महिलांना गृह शांती, आणि भविष्याबाबत माहिती देण्याकरता बोलावून घेत गुंगीचे औषध पिण्यास देत संमोहित करून कार्यालयातच बलात्कार केल्याचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे खरातचा पाय आणखी खोलात गेला आहे. अटक झाल्यानंतर खरातला सुनावण्यात आलेल्या पोलिस कोठडीची मुदत आज (दि. २४) संपणार असून त्याला आज नाशिकच्या जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. खरात लैंगिक अत्याचार प्रकरणात पीडिता तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत. रविवारी खरातविरोधात दोन गुन्हे दाखल झाले. ३० ते ३५ वयोगटातील या तक्रारदार दोन महिला उच्चशिक्षित आहेत. एक वैद्यकीय, तर दुसरी शासकीय अधिकाऱ्याची पत्नी आहे. विधानसभेत गाजला मुद्दा; मुख्यमंत्री आज देणार निवेदन मुंबई | खरातने केलेल्या शोषणावरून विधानसभा सोमवारी प्रचंड गाजली. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना कडक शब्दांत प्रत्युत्तर दिले. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून मी आज (दि.२४) विधानसभेत त्यावर सविस्तर निवेदन करणार असल्याचे ते म्हणाले. खरात देशाबाहेर पळू नये यासाठी पोलिसांनी १० मार्च रोजीच ‘लूक आऊट सर्क्युलर’ जारी केल्याचे त्यांनी सांगितले. केवळ पैसा साठवला नाही तर गुंतवणूक मालमत्तेत २०२२ मध्ये ९६ लाख असलेली मालमत्ता २०२५ पर्यंत १ कोटी ८१,६५,९३१ रुपयांवर पोहोचली. या हेल्पलाइनवर करा खरातविरोधात तक्रारी ९५०३२७०२२४, ७७७५८१६३८९ खरातविरोधात तक्रार करायची असल्यास उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी, वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे, निरीक्षक राहुल मोरे यांच्या एसआयटी पथकाशी उपरोक्त क्रमांकांवर संपर्क साधावा, नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. ‘शिवनिका संस्थान’ची कोट्यवधींची झेप, आधी लाखांची तूट, मग अचानक देणग्यांचा ‘महापूर’ सचिन जैन | खरातच्या मिरगाव येथील ‘श्री शिवनिका संस्थान’च्या पाच वर्षांतील ऑडिट रिपोर्ट ‘दिव्य मराठी’च्या हाती लागला असून त्यातून एका सामान्य देवस्थानचा ‘कॉर्पोरेट’ प्रगतीपर्यंतचा चकित करणारा प्रवास उघड झाला आहे. २०२० ते २०२२ या काळात संस्थानचे उत्पन्न ४.९० लाखांवर होते. १.६० ते १.६४ लाख रुपयांची तूट होती. मात्र २०२४ मध्ये ७६ लाख ९१ हजार ४१६ रुपये उत्पन्न झाले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp