
जिल्ह्यातील वैजापूर येथे एका महिला कीर्तनकाराची आश्रमात दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. ह.भ.प. संगीताताई महाराज असे हत्या झालेल्या कीर्तनकाराचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील एका आश्रमात संगीताताई महाराज वास्तव्यास होत्या. शुक्रवारी रात्री अज्ञात मारेकऱ्यांनी थेट आश्रमात घुसून त्यांच्यावर दगडाने वार केले. या हल्ल्यात संगीताताई महाराज यांचा जागीच मृत्यू झाला.घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे.
हत्येचे कारण अस्पष्ट
हत्या नेमकी का झाली आणि कोणी केली? याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. मात्र एका महिला कीर्तनकाराची थेट आश्रमात घुसून दगडाने ठेचून निर्घृण हत्या होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या हत्येमागे व्यक्तिगत वाद आहे की अन्य कोणते कारण, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी पोलिसांचे तपासाचे चक्र वेगाने फिरू लागले आहे.
..हे वृत्त आम्ही अपडेट करत आहोत
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.