
मुंबई13 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
तेजस देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात महेश मांजरेकर आणि किशोरी शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या मुख्य भूमिका आहे. ट्रेलरमध्ये देवमाणूस म्हणजेच महेश मांजरेकरांच्या रहस्यपूर्ण, गूढ आणि भावनिक कथानकाची झलक पाहायला मिळते. एकंदरीत ट्रेलरवरून चित्रपटात भावना, नाट्य आणि थरार यांचा संगम पाहायला मिळणार आहे.
ट्रेलरमध्ये कथा ही केशव भाऊभोवती म्हणजे महेश मांजरेकरांभोवती फिरते. महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी संपूर्ण गावाला आवडत असते. गावातील लोक महेश मांजरेकर यांना ‘देवमाणूस’ संबोधतात. पण काही गुंड त्यांच्या मागे लागले आहेत. त्याचबरोबर केशवभाऊ हा कोणत्यातरी एका पापाच्या सावलीत अडकला आहे आणि त्याच्या अंतर्मनाच्या आणि जगाबरोबरच्या संघर्षांची कहाणी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. केशवभाऊ नेमका कोणत्या पापाच्या सावलीत अडकलाय आया काही गुंड त्यांच्या मागे का लागलेत, हे आता सिनेमा पाहिल्यावरच कळेल. दमदार अभिनय, दाट भावनांचा प्रवाह आणि उत्कंठा वाढवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट एक संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.
25 एप्रिलला होणार प्रदर्शित
लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्स या प्रसिद्ध निर्मिती संस्थेने देवमाणूस चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा त्यांचा पहिलाच मराठी सिनेमा आहे. तर सिनेमाची दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले आहे. चित्रपटात महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांसारखे मातब्बर कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 25 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
देवमाणूसच्या ट्रेलरने ‘सिंघम’ला घातली भूरळ
दरम्यान, महेश मांजरेकर यांच्या देवमाणूस चित्रपटाच्या ट्रेलरची बॉलिवूड अभिनेता अजय देवगण यालाही भूरळ पडली. अजय देवगणने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला. यासोबतच त्याने निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग यांचे मराठीतील पदार्पणाबद्दल अभिनंदन केले. ट्रेलर खूपच उत्कंठावर्धक आहे, देवमाणसाची सटकली की काय होते…? असे म्हणत अजय देवगणने चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर राजकुमार राव, अर्जुन कपूर, सनी सिंग यानेही या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited