digital products downloads

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेला गती: 9 एप्रिलला संभाजीनगरमध्ये भव्य विभागीय कार्यशाळा, आरोग्यमंत्री आबिटकरांची उपस्थिती – Chhatrapati Sambhajinagar News

‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेला गती:  9 एप्रिलला संभाजीनगरमध्ये भव्य विभागीय कार्यशाळा, आरोग्यमंत्री आबिटकरांची उपस्थिती – Chhatrapati Sambhajinagar News



राज्यात आरोग्य सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” या महत्त्वकांक्षी मोहिमेचे तळागाळापर्यंत व्यवस्थित नियोजन होऊन अंमलबजावणी व्हावी यासाठी गाव पातळीवरील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विभागीय कार्यशाळेचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मंथन सभागृह, एमआयटी कॉलेज, बीड बायपास रोड, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सर्वसमावेशक व परिणामकारक करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. कार्यशाळेस विभागातील आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव रविंद्रन, सार्वजनिक आरोग्य विभाग आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, शहरी आरोग्य विभाग आयुक्त डॉ. सुनील भोकरे, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर तसेच आरोग्य सेवा प्राथमिक संचालक डॉ. विजय कंदेवाड हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा, प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना, जनजागृती कार्यक्रम तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच “माझं गांव, आरोग्य संपन्न गाव” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आवश्यक असलेल्या कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. सदर कार्यशाळेत छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक परिमंडळातून एकूण-१३ जिल्ह्याचा समावेश असून जवळपास हजार अधिकारी कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.कांचन वानेरे, उपसंचालक, आरोग्य सेवा परिमंडळ, छत्रपती संभाजीनगर, डॉ.रेखा गायकवाड उपंसचालक आरोग्य सेवा परिमंडळ लातुर तसेच डॉ कपिल आहेर उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ नाशिक यांच्यामार्फत करण्यात आले आहे. हे ही वाचा… क्रूरतेचा कळस:गर्भपातासाठी ‘पार्सल पाठवा’चा कोडवर्ड; भ्रूण नष्ट करण्याची जबाबदारी मातेवरच, गर्भपात रॅकेटचा मास्टरमाइंड डॉ. सुनील राजपूत शहरातील सातारा परिसरात उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भलिंगनिदान आणि गर्भपात रॅकेटमध्ये अंगावर काटा आणणारे गौप्यस्फोट होत आहेत. या मृत्यूच्या खेळाचा मुख्य सूत्रधार (मास्टरमाइंड) टीव्ही सेंटर भागात राहणारा डॉ. सुनील राजपूत असल्याचे तपासात पुढे आले आहे. तो मागील ७ ते ८ वर्षांपासून हे सिंडिकेट चालवत आहे. या प्रकरणात तो तुरुंगातून बाहेर आला की पुन्हा हाच प्रकार करायचा. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp