
Farmer Emotional Post: ‘माझं लग्न होईल का?’ अशी अविवाहित उच्चशिक्षित शेतकरी तरुणाने फेसबुकवर भावनिक पोस्ट करीत लग्नाची इच्छा वाक्य केलीय. शेतकरी तरुणांच्या लग्नाचा सामाजिक प्रश्न ऐरणीवर आला असून लग्न जुळत नसल्याने शेतकर्यांची उपवर मुलं आपल्या जीवनयात्रा संपवित आहेत. पण परभणीच्या उच्चशिक्षित शेतकरी तरुणाने फेसबुक पोस्ट टाकून शेतकऱ्यांच्या मुलांच्या वेदना मांडल्या आहेत.
एमएससी बॉयोटेक झालेले गोविंद गिरी हे परभणीच्या सावंगी खुर्द गावात राहतात. त्यांच्याकडे साडे चार एकर शेती आहे. परभणी शहरातील कृषी सारथी कॉलनीत त्यांचे दुमजली घर आहे. तिन्ही बहिणींचे लग्न झाले असून एकुलते एक आहेत. वडील जिल्हा मध्यवर्ती बँकेतून निवृत्त झालेत. त्यामुळे बँकेत बॅलेन्सही चांगला असल्याचे ते सांगतात. गोविंद गिरी सामाजिक क्षेत्रातही काम करतात. त्यांना समाजात प्रतिष्ठा आहे. पण 33 वर्ष उलटून गोविंद यांना लग्नासाठी सोयरिक येत नाहीय. त्यामुळे गोविंद गिरी चिंतेत आहेत. या चिंतेतच त्यांनी ‘माझं लग्न होईल का?’ अशी भावनिक पोस्ट फेसबुकवर केली आणि आपल्या मनातल्या भावनांना फेसबुकवर वाट मोकळी करुन दिली.
राज्यभरात उपवर शेतकरी मुलांच्या लग्नाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. आतापर्यंत हिंगकलक,परभणी, अकोला,जालना येथे लग्न होत नसल्याने शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या जीवनयात्रा संपविल्या आहेत. सोलापूर आणि परभणी मध्ये अविवाहित तरुणांनी मुंडावळ्या बांधून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत लग्नासाठी मुली द्या अशी मागणी केली होती,शेती उत्पनापेक्षा उत्पादन खर्च अधिक झाल्याने आणि नैसर्गिक संकटामुळे शेतकरी आत्महत्या करीत असतात. त्यामुळे मुली ‘शेतकरी नवरा नको ग बाई’, असं म्हणतायत.
शासन,समाजाने लक्ष देणे गरजेचे
राज्यात 1 हजार मुलांच्या तुलनेत मुलींचे लिंग गुणोत्तरे प्रमाण 929 एवढे आहे. हिंगोली जिल्ह्यात 882 तर परभणी जिल्ह्यात 884 एवढे आहे. राज्यातील 7 जिल्ह्यात मुलांच्या मुलींचे लिंगगुंणोत्तरे प्रमाण खूप कमी असल्याचे समोर आले आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेती पिकत नसल्याने शेतकरी दादला नको ग बाई असच मुली म्हणतांना बघायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा सामाजिक प्रश्न आता अधिकच जटिल होण्याअगोदर हा प्रश्न शासनाने आणि समाजातील नागरिक सोडविणे गरजेचे बनले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.