digital products downloads

माझा पक्ष, माझा बाप अन् आता भाऊही पळवला: राज-एकनाथ भेटीनंतर अनेकांना पोटशूळ उठले; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा – Mumbai News

माझा पक्ष, माझा बाप अन् आता भाऊही पळवला:  राज-एकनाथ भेटीनंतर अनेकांना पोटशूळ उठले; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा – Mumbai News



उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात नुकत्याच झालेल्या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर राजकीय प्रतिक्रियांचा पाऊस पडत असतानाच, शिंदे गटाच्या नेत्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे. “या भेटीमुळे अनेकांना पोटशूळ उठला आहे,” अशा शब्दांत शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी टीकास्त्र सोडले आहे. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर नरेश म्हस्के यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, “काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांची भेट झाली. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि अनेकांना पोटशूळही उठला आहे. परंतु, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीतून घडलेले हे दोन कार्यकर्ते जर हिंदुत्वाच्या विचारासाठी आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एकत्र येणार असतील, तर माझ्यासारख्या तमाम शिवसैनिकांना याचा मोठा आनंदच होईल.” म्हस्के यांच्या या विधानाने आगामी काळात महायुती आणि मनसे यांच्यातील जवळीक अधिक वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. ‘आता माझा भाऊ पळवला’; शीतल म्हात्रेंचा खोचक टोला दुसरीकडे, शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी अत्यंत उपरोधिक भाषेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी ‘माझा पक्ष पळवला, माझा बाप पळवला’ असे आरोप एकनाथ शिंदे यांच्यावर केले होते. त्याचाच संदर्भ घेत म्हात्रे यांनी “माझा पक्ष पळवला… माझा बाप पळवला… आता माझा भाऊ पळवला.” या विधानातून त्यांनी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या एकत्र येण्यावरून उद्धव ठाकरेंच्या हतबलतेवर निशाणा साधला आहे. महापौर पाठिंब्यानंतर पहिलीच भेट कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेने सर्वाधिक जागा मिळवत आघाडी घेतली. मात्र, ठाकरेंची शिवसेना आणि मनसेला अपेक्षित यश मिळाले नाही. तरीही महापौर निवडीच्या वेळी मनसेने शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला होता. विशेष म्हणजे भाजप आणि शिवसेनेविरुद्ध लढत असतानाही मनसेने घेतलेला हा निर्णय सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष असताना, ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीत असलेल्या मनसेने थेट शिंदे गटाला साथ दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आजची भेट अधिकच लक्षवेधी ठरली आहे. शिंदेंनी मानले आभार, राज म्हणाले – सहकार्य राहील महापालिकेतील मनसे नगरसेवकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांचे आभार मानले. त्यावर राज ठाकरे यांनीही महापालिका सभागृहातील कामकाजात मनसेचे सहकार्य राहील, असे आश्वासन दिल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या चर्चेत केवळ केडीएमसीपुरती मर्यादा नसून इतरही राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या भेटीनंतर स्थानिक राजकारणात नवी समीकरणे आकार घेत आहेत का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp