
Ganeshotsav News Sanjay Shirsat Contraverical Comment: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या वेळेस बेडरुममध्ये पैशांची बॅग घेऊन बसल्याचा मंत्री संजय शिरसाट यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ आता पुन्हा गणेशोत्सवाच्या निमित्ताने चर्चेत आलाय तो शिरसाट यांनीच जाहीर सभेत केलेल्या एका विधानामुळे. या विधानावरूनही शिरसाटांवर कठोर शब्दांमध्ये टीका होताना दिसतेय. शिरसाट नक्की काय म्हणालेत पाहूयात…
नेमकं काय म्हणाले शिरसाट
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असलेले शिरसाट कुठल्या ना कुठल्या विधानांमुळे सतत वादात असतात. त्यात आता पुन्हा त्यांचा एक नव्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे. “गणेशोत्सवादरम्यान डीजे मुळे त्रास होतो. डीजेऐवजी बाहेरगावचे भारी बॅण्ड पथक, ढोल पथकावर भर लावा. ऐकायला, पाहायला छान वाटते. पैशांसाठी व्यासपीठावर नेते आहेत, त्यांनी नाही दिले तर शेवटी मी आहेच. माझी बॅग उघडीच आहे. आपण व्हिडीओची चिंता करत नाही,” असे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर सभेत म्हटलं. व्यासपीठावरून केलेल्या या वक्तव्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. मात्र सततच्या विधानाने वादात अडकलेले शिरसाट थांबायचं काही नाव घेत नाही अशीही चर्चा यानंतर सुरू झाली आहे.
त्या बॅगेत 12 ते 15 कोटी होते
“त्यांच्या बॅगेत 12 ते 15 कोटी रुपये असतील. त्या बॅगेत शिरसाट यांचे पैसे नव्हते गरीब जनतेचे पैसे होते. आता त्या बॅगवर ते बोलत असतील तर अयोग्य आहे. आता ते बॅगेतील पैशाबाबत उघड बोलत आहेत. भ्रष्टाचाराबाबत उघड बोलत आहेत. त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे. संजय शिरसाट यांचा राजीनामा घेण्यात यावा यातही आम्ही सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आंदोलन करू,” असं शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
राऊतांनी साधला निशाणा
संजय शिरसाट गणेश उत्सव डीजे वाजवा पैसे माझी बॅग खुली आहे, असं म्हटल्याच्या मुद्द्यावरुन खासदार संजय राऊत यांनीही टोला लगावला आहे. “हे जे लुटलेले पैसे आहेत ते त्या बॅगेत आहेत. त्याच्यावर गणेशोत्सव साजरा करा हा स्पष्ट संदेश आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
FAQ
संजय शिरसाट यांनी गणेशोत्सवाबाबत काय विधान केले?
छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी एका जाहीर सभेत सांगितले की, “गणेशोत्सवादरम्यान डीजेमुळे त्रास होतो. डीजेऐवजी बाहेरगावचे भारी बँड पथक, ढोल पथकावर भर द्या. पैशांसाठी व्यासपीठावर नेते आहेत, त्यांनी नाही दिले तर शेवटी मी आहेच. माझी बॅग उघडीच आहे.”
शिरसाट यांच्या विधानावर सभेत काय प्रतिक्रिया उमटली?
शिरसाट यांच्या “माझी बॅग उघडीच आहे” या मिश्कील वक्तव्यावर सभागृहात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. मात्र, या विधानामुळे त्यांच्यावर पुन्हा टीका होऊ लागली.
शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडीओवर कोणत्या राजकीय नेत्यांनी टीका केली?
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी शिरसाट यांच्या विधान आणि व्हायरल व्हिडीओवर कठोर टीका केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.