digital products downloads

माझे 35 कोटींचे कमिशन कार्यकर्त्यांमध्ये वाटले: सायकलवर फिरणारा कार्यकर्ता फॉर्च्यूनरमध्ये फिरतोय, शिंदेंच्या आमदाराची जाहीर कबुली – Buldhana News

माझे 35 कोटींचे कमिशन कार्यकर्त्यांमध्ये वाटले:  सायकलवर फिरणारा कार्यकर्ता फॉर्च्यूनरमध्ये फिरतोय, शिंदेंच्या आमदाराची जाहीर कबुली – Buldhana News



आपल्या आक्रमक आणि अनेकदा वादग्रस्त ठरणाऱ्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केले आहे. “माझं जवळपास ३५ कोटी रुपयांचं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं, म्हणूनच आज माझ्यासोबत सायकलवर फिरणारा कार्यकर्ता फॉर्च्युनर कारमध्ये फिरत आहे,” अशी जाहीर कबुलीच संजय गायकवाड यांनी दिली आहे. या विधानामुळे राजकीय क्षेत्रातील ‘कमिशन संस्कृती’ आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून, राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे. चिखली मतदारसंघातील विविध पक्षांच्या सुमारे ६०० कार्यकर्त्यांनी रविवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. बुलढाणा येथील आमदार गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात हा सोहळा पार पडला. यावेळी नूतन कार्यकर्त्यांचे स्वागत करताना आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या प्रगतीचे दाखले देताना संजय गायकवाड यांनी थेट कोट्यवधी रुपयांच्या कमिशनचा उल्लेख करत कार्यकर्त्यांना आर्थिक ताकद दिल्याचा दावा केला. नेमके काय म्हणाले संजय गायकवाड? आमदार संजय गायकवाड भाषणात म्हणाले की, “शिवसेना आता सत्तरीच्या उंबरठ्यावर आहे. चिखली मतदारसंघ एकेकाळी अतिशय मजबूत होता, पण हळूहळू कार्यकर्ता विखुरला गेला. मी महाराष्ट्रातील एक ताकदवर आमदार आहे आणि कुणालाही घाबरत नाही. आमची ताकद ही कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आहे. माझ्या मतदारसंघातील एकही माणूस सांगणार नाही की आम्ही कोणाचा छळ केला. उलट, माझ्यासोबत जे कार्यकर्ते कधीकाळी सायकलवर असायचे, त्यांना मी फॉर्च्युनरपर्यंत पोहोचवले आहे. यासाठी मी माझे ३५ कोटींचे कमिशन कार्यकर्त्यांच्या हितासाठी खर्च केले.” राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण एका लोकप्रतिनिधीने जाहीर व्यासपीठावरून ‘कमिशन’ मिळाल्याची आणि ते वाटल्याची कबुली दिल्याने जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. हे कमिशन नेमके कोणत्या कामातून आले आणि ते अशा प्रकारे वाटणे कायदेशीर आहे का? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. संजय गायकवाड यांनी “कार्यकर्ते स्ट्राँग झाले की आम्ही स्ट्राँग होतो,” असे सांगत आपल्या कृतीचे समर्थन केले असले, तरी विरोधकांच्या हाती मात्र यामुळे मोठे कोलीत मिळाले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp