
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची निवडणूक लढवत आहेत. त्यांनी बुधवारी बारामती तालुक्यातील सांगवी येथील प्रचारसभेत आपल्या उमेदवारीने अनेकांच्या पोटात गोळा उ
.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘निळकंठेश्वर पॅनल’ आणि भाजप नेते चंद्रराव तावरे यांच्या ‘सहकार बचाव पॅनल’मध्ये थेट लढत आहे. अजित पवार या निवडणुकीच्या प्रचारात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. बुधवारी त्यांनी बारामती तालुक्यातील सांगवी गावात प्रचारसभा घेतली. त्यात ते म्हणाले, मी फुले, शाहू आंबेडकर यांचे विचार घेऊन पुढे जात आहे. कुठे डाग पडेल असे कोणतेही काम मी आजपर्यंत केले नाही.
खासगीकरणाचे नव्हे सहकाराचे समर्थन
मी खासगीकरणाचे समर्थन करत नाही. मी सहकाराचे समर्थन करतो. त्यामुळे मला एकदा चेअरमन व्हायचे आहे. पुढील 5 वर्षांत शेतकऱ्यांना कसा चढा भाव देता येतो हे मला दाखवून द्यायचे आहे. मी भ्रष्टाचाराला थारा देणार नाही. हा कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून दाखवेन. माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर विरोधकांच्या पोटात आला. ते म्हणतात ‘ब’ वर्गातून चेअरमन होता येत नाही. त्यांना म्हणावे सहकार खाते बघितले का कुणाकडे?
मतदारांनी पॅनल टू पॅनल मतदान करावे. तुम्ही तुमचे काम चोखपणे केले, तर मी 5 वर्षांत पुढचे काम चोख करेन. मी ऑल इन वन आहे. कुणाचेही काम अडू देणार नाही. आमच्या पॅनलचा चेअरमन ठरलेला आहे. बाकीच्या तीन पॅनेलच्या लोकांनी सांगावे की आमचा हा चेअरमन आहे, असे ते म्हणाले.
तुम्ही पायजम्यावरून लुंगीवर आलात
अजित पवार यांनी यावेळी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा भाजपा नेते चंद्रराव तावरे यांच्यावर त्यांच्या वयावरून निशाणा साधला. माणसाने वय झाल्यानंतर कुठेतरी थांबले पाहिजे. तुम्ही पायजम्यावरून लुंगीवर आला. त्रास होतोय म्हणूनच आला ना? मी तुम्हाला व्यवस्थीत पाणी देईल. आम्ही सरकारमध्ये आहोत. मागच्या वर्षी 21 पैकी 18 जागांवर आमचे उमेदवार निवडून आले. विरोधकांचे केवळ 3 जण आले. त्यातील एकही जण 5 वर्षांत कारखान्यात गेला नाही. याऊलट आम्ही विरोधात असतानाही घरी बसलो नाही, असे ते म्हणाले.
हे ही वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.