
Sanjay Shirsat: महाराष्ट्रातील लाडक्या बहीणी 2100 रुपयांचा हफ्ता कधीपासून मिळणार याची वाट पाहतायत. त्यात त्यांना एप्रिल महिन्याचा हफ्ताही अद्याप मिळाला नाहीय. हे सर्व सुरु असताना लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीत धुसूफूस सुरु असल्याचे पाहायला मिळतंय. लाडकी बहीण योजनेवरुन शिंदेंचे आमदार संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केलीय. काय म्हणाले शिरसाट? सविस्तर जाणून घेऊया.
माझ्या खात्याचे पैसे लाडकी बहीणसाठी वर्ग करण्यात आले. पूर्वीदेखील 7 हजार कोटी वर्ग करण्यात आले होते. याची मला पुसटशी कल्पना नसल्याचे धक्कादायक विधान मंत्री संजय शिरसाठी यांनी केलंय. या खात्याची आवश्यकता नसेल तर हे खाते बंद करा. दलित मागासवर्गीय काय करायचं बघू अशा शब्दात त्यांनी नाराजीदेखील व्यक्त केलीय.
याला अन्याय म्हणा, कट म्हणा, असे का करताय कळत नाही. फायनान्स विभाग मनमानी करतंय. सहन करण्याची मर्यादा आहे. सगळं कट करून टाका. कशाला हवी शिष्यवृत्ती? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. या खात्याचा निधी वर्ग करता येत नाही. कट करता येत नाही. फायनान्स वाले जास्त डोके चालवत असेल तर हे आम्हाला मान्य नसल्याचे संजय शिरसाट म्हणाले.
मला हे पटलेलं नसून मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलेन. माझ्या खात्यावर याचा निश्चित परिणाम होईल. एक दिवस अशी गळती लागेल की काम होणार नाही, असेही ते म्हणाले.
गेल्यावेळी मी त्यांना निधी कापल्यावर पत्र दिले होते. तसे आताही देणार आहे. माझ्या खात्याचा निधी वर्ग करता येत नाही. हा कायदा आहे. हा कायदा डावलून सर्व सुरुय. वित्त विभागात काही महाभाग त्यांची मनमानी करताय, असे ते म्हणाले. हे चूक असून असे करता येत नाही. लाडकी बहीण योजनेला पैसे द्या पण यात जातीवाद व्हायला नको, असे शिरसाठ यांन सांगितलंय. पैसे कुठून काढायचे हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा विषय आहे. वित्त विभागातील शकुनी हे करताय.
100 दिवसांचे ऑडिट ही सुरुवात आहे. मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्री मायनस आहेत. गॅप आहे तो भरून काढतोय. म्हणून मायनस दिसतंय, असेही ते म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.