
प्रतिनिधी | फुलंब्री मित्र साधना शिक्षण प्रसारक मंडळ, पाथ्री संचालित राजर्षी शाहू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन ‘युवोत्सव २०२५-२६’ चा समारोप समारंभ शनिवारी उत्साहात झाला. या वेळी प्रख्यात कवी, गीतकार तथा साहित्यिक प्रा. इंद्रजित भालेराव हे उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या वेळी अध्यक्षस्थानी डॉ. रश्मीताई पाथ्रीकर होत्या. उषाताई द्वारकादास पाथ्रीकर, कल्याणी पाथ्रीकर, जि. प. सदस्या गीतांजली वरून पाथ्रीकर, डॉ. सचिन मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. समारोपप्रसंगी बोलताना प्रा. इंद्रजित भालेराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘माणसाने आपल्या मातीशी नाळ जोडून ठेवली पाहिजे. जीवनात यश मिळवायचे असेल तर कष्ट, जिद्द, संस्कार यांची साथ आवश्यक आहे.’ त्यांनी आपल्या आयुष्यातील संघर्ष, साहित्यप्रवास, अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. त्यांच्या प्रेरणादायी भाषणामुळे विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांची जाणीव झाली. समारोप समारंभाने या संपूर्ण उत्सवाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील मिरगणे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून युवोत्सवाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी वर्षभराचा अहवाल वाचन केला. या वेळी उपप्राचार्य डॉ. शशिकांत बंडेवार, डॉ. युवराज गहेराव, डॉ. दीपक गायकवाड, डॉ. किशोर वाघ, प्रा. पवन काळे, डॉ. आरती थाले, डॉ. रामदास जाधव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर वाघ यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. दीपक गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान ः युवोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक, साहित्यिक व क्रीडा स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळाला. महाविद्यालयीन वातावरणात उत्साह निर्माण झाला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



