
Maharashtra Weather News : मजल दरमजल करत मान्सून अखेर केरळातून महाराष्ट्राच्या तळकोकणात धडकला आणि तिथून 24 तासांहून कमी कालावधीत तो मुंबईतही पोहोचला. मान्सूननं हजेरी लावल्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शहराला पावसाचा तडाखा बसला आणि संपूर्ण यंत्रणाच कोलमडली. राज्याच्या इतर भागांमध्येही ही स्थिती कायम असून, मराठवाडा आणि विदर्भातील काही भाग मात्र इथं अपवाद ठरले. दरम्यान पुढील 24 ते 48 तासांमध्ये राज्याच्या कोकण भागासह मुंबई शहर आणि उपनगरांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सध्याच्या घडीला मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, अरबी समुद्रात पश्चिमी वाऱ्यांची स्थिती भक्कम झाली असून, आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर तिथं सह्याद्रीच्या डोंगररांगांसह घाट क्षेत्रावरही सातारा, कोल्हापूर, पुण्याच्या घाटांमध्ये पावसासाठीचे वारे आणखी तीव्र होत असून, पुणे शहरासाठी पुढील 48 तासांसाठी ऑरेंज अलर्ट आहे, जिथे मध्यम ते काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आहे.
कोणत्या भागासाठी कोणता अलर्ट?
पुढील 24 तासांसाठी मुंबई, रायगड, ठाणे, सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पुण्याच्या घाट क्षेत्रासह साताऱ्याचे आणि सिंधुदुर्ग, कोल्हापूरातही जोरदार पावसाच्या इशाऱ्यासह ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
नैऋत्य मोसमी पाऊस आज 26 मे रोजी. मुंबई, पुणे, शोलापूर, काळबुर्गी, महबूबनगर, कवळी, पोहोचला आहे#IMD #WeatherUpdate #mausam #rainfall #mumbairain #thunderstorm pic.twitter.com/ebTyBdWAEt
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 26, 2025
कोणता अलर्ट काय सुचवतो?
रेड अलर्ट : अतिवृष्टीची शक्यता, खबरदारी घ्या
ऑरेंज अलर्ट: जोरदार पावसाची शक्यता, तयारीत राहा
यलो अलर्ट: पावसाची शक्यता, सतर्क राहा
ग्रीन अलर्ट: सर्व सामान्य स्थिती
मान्सूनची पुढील वाटचाल कशी असेल?
मान्सूनची आतापर्यंतची वाटचाल पाहता पुढील तीन ते पाच दिवसांत मान्सूनचे वारे संपूर्ण राज्य व्यापतील अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागानं जारी केली आहे. दरम्यान, कोकण, पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज असून, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिजोरदार आणि अहिल्यानगर, सातारा, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अतिजोरदार, तसेच सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये जोरधारांचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना पुढील पाच दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.