digital products downloads

मान्सून ट्रेकची सोय झाली! पाहा रायगड जिल्ह्यातील गड-किल्ल्यांची संपूर्ण यादी; A to Z नावं

मान्सून ट्रेकची सोय झाली! पाहा रायगड जिल्ह्यातील गड-किल्ल्यांची संपूर्ण यादी; A to Z नावं

Monsoon Trekking in Raigad District : ट्रेकिंग… कठिण ते अगदी सोप्या वाटा सर करत एखाद्या गडकिल्ल्याच्या किंवा सुळक्याच्या टोकाळी पोहोचण्याचा कमाल थरार. पावसाळ्याची सुरुवात होताच अनेक मंडळी ट्रेकिंगसाठी निघतात. राज्यातील बहुतांश गडकिल्ल्यांपर्यंत पोहोचतात आणि भटकंतीला वेगळ्याच दृष्टीकोनातून अनुभवतात. 

ट्रेकर आणि प्रवासवेड्या अनेकांचंच प्राधान्य असणारं ठिकाण म्हणजे रायगड जिल्हा. मुंबईपासून दोन ते तीन तासांच्या अंतरावरही या जिल्ह्यातील काही गडकिल्ले स्थित असून काही गडकिल्ल्यांची नावं तर अनेकांना ठाऊकही नाहीत. चला तर मग, याच रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये असणाऱ्या विविध गडकिल्ल्यांच्या नावाची यागी पाहूनच घ्या. 

तालुक्यानुसार किल्ल्यांची नावं… ही घ्या यादी 

कर्जत – विकटगड, पदरगड, कोथळीगड, भिमगड, सोंडई, ठाक बहिरी, तुंगी, सोनगिरी
खालापूर- ईरशाळगड 
सुधागड- सुधागड, भोरपगड, सरसगड, मृगगड 
रोहा- सूरगड, बिरवाडी, घोसाळगड 
माणगाव- विश्रामगड, मानगड, पन्हाळेदुर्ग
महाड- रायगड, पाचाड कोट, लिंगाणा, सोनगड, चांभारगड, मंगळगड, कोकणदिवा, दासगाव 
पोलादपूर- चंद्रगड, कोंढवी 
श्रीवर्धन- मदगड
मुरूड- जंजिरा, कोरलई, समराजगड, पद्मदुर्ग
तळा- तळागड 
अलिबाग- उंदेरी, खुबलढा, कुलाबा, सर्जेकोट, सागरगड, रेवदंडा, हिराकोट, रामदरणे, राजकोट 
उरण- घारापुरी, द्रोणागिरी
पेण- सांकशी, रतनगड, मिरगड 
पनवेल- प्रबळगड, कर्नाळा, माणिकगड

हेसुद्धा वाचा : Monsoon 2025 : यंदा वेळेआधीच मान्सूनचं आगमन? थेट अंदमान- निकोबार बेटांवरून आलीय आनंदाची बातमी

 

पावसाच्या दिवसांमध्ये निसर्गसौंदर्याची वेगळीच छटा पाहायला मिळते. त्यातगी रायगडमधील बहुतांश ठिकाणं अशी आहेत जी आजही गर्दीपासून दूर आहेत. अशा या ठिकाणांवर पोहोचण्याची वाट बिकट असली तरीही तिथवर जाण्याची वाट मात्र तितकीच थरारक आहे. त्यामुळं यंदाच्या वर्षी हा थरार अनुभवायचा असेल तर रायगड जिल्ह्यातील या प्रसिद्धीझोतात नसलेल्या गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या. 

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp