
Kunal Kamra Appology: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त पॅरेडी केल्यानंतर कुणाल कामराला शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागतंय. महाराष्ट्र सरकार आणि पोलीसदेखील कुणाल कामराच्या मागावर आहेत. कुणालने माफी मागावी,असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. तर मुंबई पोलिसांनी कुणाललला हजर राहण्यासाठी समन्स बजावलंय. कुणाल कामराने शो केलेल्या शोची तोडफोड करण्यात आलीय. तसेच शोला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना नोटीस पाठवण्यात आल्याचेदेखील म्हटलं जातंय. यामुळे एका प्रेक्षकाला नाहक त्रास सहन करावा लागला. महाराष्ट्र सरकारला माफी न मागण्यावर ठाम असलेल्या कुणाल कामराने शोला उपस्थित असलेल्या प्रेक्षकाची माफी मागितलीय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
विनोदी कलाकार कुणाल कामराच्या शोला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना नोटीस येऊ लागल्या आहेत. मानहानीच्या खटल्यात साक्षीदार म्हणून चौकशीसाठी मुंबई पोलिसांसमोर हजर राहण्याची नोटीस देण्यात येत आहे. अशीच नोटीस मिळाल्यानंतर खारघर येथील एका बँकिंग व्यावसायिकाला लवकर परतावे लागले. ही व्यक्ती तामिळनाडू आणि केरळला फिरायला गेली होती. पण पोलिसांच्या दबावामुळे त्यांना परत यावे लागल्याचे वृत्त आहे.
‘नया भारत’ या विशेष कार्यक्रमाबद्दल कुणाल कामराविरुद्ध आतापर्यंत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 17 दिवसांच्या ट्रीपवर असलेल्या या व्यक्तीला 6 एप्रिल रोजी परतायचे होते. असे असताना 28 मार्च रोजीच त्यांना पोलिसांचा फोन आला. दुसऱ्या दिवशी त्याच्या व्हॉट्सअॅपवर नोटीस आली. तुम्हाला सोमवारी मुंबईत परत यावे लागले. सीआरपीसीच्या कलम 179 अंतर्गत 30 मार्च रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितल्याचे म्हंटल्याचा दावा करण्यात आलाय.
‘मी 21 मार्च रोजी मुंबईहून सहलीसाठी निघालो होतो आणि 6 एप्रिल रोजी परतणार होतो. पण मी तामिळनाडूमध्ये असताना पोलिसांकडून वारंवार फोन आल्यानंतर मी मध्येच परतलो. ज्या अधिकाऱ्याने मला फोन केला होता त्याने माझ्या शहराबाहेरील स्थितीबद्दल शंका घेतली. एवढेच नव्हे तर माझ्या खारघर येथील निवासस्थानी येण्याची धमकी दिली. यामुळे मी माझी ट्रीप लवकर आटपती घेतली आणि परतलो,” बॅंकरने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
“मी शोसाठी ऑनलाइन तिकीट बुक केले आहे आणि माझ्याकडे बुकिंगचा पुरावा आहे असे मी पोलिसांनी सांगितले. मी कामराने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ एडीट केलाय, असे त्यांना वाटत असेल. कुणाल कामरा त्याच्या शोचा व्हिडिओ मला एडीटसाठी का देईल?’, असा प्रश्न त्याने उपस्थित केला.
दरम्यान कामराच्या शोच्या प्रेक्षकांना अशा कोणत्याही नोटीस बजावण्यात आलेल्या नाहीत.कोणत्याही प्रेक्षकाला चौकशीसाठी बोलावण्यात आले नाही, असे पोलिसांकडून पीटीआयला सांगण्यात आलंय.
काय आहे कुणाल कामरा वाद?
24 मार्च रोजी विनोदी कलाकाराने ‘नया भारत’ हा त्यांचा नवीन विशेष कार्यक्रम युट्यूबवर अपलोड केला. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन तोडफोड केली. कामराने कार्यक्रमादरम्यान सादर केलेल्या एका गाण्यावरून हा संताप व्यक्त करण्यात आला, ज्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ म्हटले होते.
यानंतर कामराच्याविरुद्ध आतापर्यंत 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कामराला मद्रास उच्च न्यायालयाने अटकेपासून अंतरिम दिलासा दिला आहे. पोलीसांकडून कामराच्या कार्यक्रमाचे छायाचित्रण करणाऱ्या कॅमेरामन आणि शोच्या चित्रीकरणादरम्यान उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवत आहेत.
काय म्हणाला कुणाल कामरा?
माझ्या शोमध्ये सहभागी झाल्यामुळे तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल मी मनापासून दिलगीर आहे. कृपया मला ईमेल करा जेणेकरून मी तुमची पुढची सुट्टी भारतात कुठेही शेड्यूल करू शकेन.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.