
आपण माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक जुळवून घेण्याचा विचार करत होतो, मुख्यमंत्र्यांशी माझे तसे बोलणेही सुरू होते. कारखान्याच्या 21 जागांपैकी 10 जागा आणि पहिले अडीच वर्षे चेअरमनपद, असा प्रस्ताव खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला होता. मात्र,
.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नीलकंठेश्वर पॅनेलने 21 जागांपैकी 20 जागांवर विजय मिळवून मोठा विजय मिळवला आहे. विजयानंतर आयोजित केलेल्या सभासद आभार मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पडद्यामागच्या राजकीय हालचालींवर भाष्य करत उपरोक्त गौप्यस्फोट केला.
नेमके काय म्हणाले अजित पवार?
मी कुणाचा कायम दुश्मन नाही, मला देवेंद्र फडणवीस म्हणाले आपण राज्यात आणि केंद्रात एकत्र आहोत, मग माळेगाव मध्ये का मार्ग काढत नाहीत. थोडे पुढे मागे सरका, 10/10 आणि 21 वा मी. मुख्यमंत्री म्हणाले, अडीच-अडीच वर्षे वाटून घेऊ. पण, मी काही बोललो नाही. म्हणालो, तुम्ही सांगा, मग त्यांनी चर्चा केली आणि त्यांना कुणीतरी सांगितले की हवा आपली ,असे म्हणत नाव न घेता अजित पवारांनी चंद्रराव तावरेंना लक्ष्य केले. मग सगळे इथेच फिस्कटले असा किस्सा अजित पवारांनी माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान घडल्याची माहिती विजयी सभेत दिली.
मी 1991 साली कारखान्याच्या निवडणुकीसाठी उभा होतो, त्यानंतर मी 95, 99 ला स्वतः मतमोजणीला उपस्थिती होतो. आपले उमेदवार मतमोजणी ला कुठे होते? उमेदवार होते कुठे? असे कसे तुम्ही करू शकता? हे बरोबर नाही, असे म्हणत अजित पवारांनी उमेदवारांवरही आपला संताप बोलून दाखवला.
विरोधकांच्या डोक्यातील हवा सभासदांनी उतरवली
मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावामुळे विरोधकांना माळेगावच्या चेअरमनपदाची संधी आली होती. माळेगाव कारखान्याबाबत ‘छत्रपती’ प्रमाणे तडजोडीतून मार्ग काढावा, असा आग्रह देवेंद्र फडणवीसांचा होता. छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी तसे प्रयत्नही केले. मात्र, विरोधकांच्या डोक्यात वेगळीच हवा होती, सभासदांनी नेमकी तीच हवा एका दणक्यात उतरवली, असा टोलाही अजित पवारांनी चंद्रकांत तावरेंना नाव न घेता लगावला.
…त्यामुळे तुतारीवाल्यांसोबतची बोलणी फिस्कटली
अजित पवार म्हणाले, निवडणुकीच्या काळात मला तुतारीवाल्यांचे बारामती तालुकाध्यक्षही भेटले. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या लोकांची यादी मला दिली आणि सांगितले,‘हे आमचे उमेदवार आहेत, यातील तीन उमेदवार घ्या’. त्यांचा मी आदर केला, पण त्यानंतर त्यांनी पुन्हा फोन केला आणि ‘गणपत देवकाते ॲड. राजेंद्र काटे यांच्या नावासाठी आग्रह धरला. मला ते आवडले नाही. त्यामुळे तुतारीवाल्यांच्या पक्षाबरोबर झालेली बोलणी फिस्कटली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.