
मुंबईतील माहिममधील कॅडेल रोडवरील प्रसिद्ध मखदूम शाह दर्गाहाशेजारील एका फूड स्टोअरमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले आहेत. मुंबई अग्निशमन दलाने तत्परतेने बचावकार्य करत आग काही मिनिटांत आटो
.
यासंबंधीच्या प्राप्त माहितीनुसार, मखदुम फूड स्टोअरमध्ये गुरुवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास सिलिंडरचा मोठा स्फोट झाल्याने दुकानाला आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अल्पावधीतच आगीवर नियंत्रण मिळवले आणि ती दुकानाच्या परिसरापुरती मर्यादित ठेवण्यात यश मिळवले. अग्निशमन दलाने अवघ्या 23 मिनिटांत आग विझविली. त्यामुळे मोठी वित्तहानी टळली. मात्र तोपर्यंत अनेक लोक जखमी झाले होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत आणि जखमींची नावे
या दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्वांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. 38 वर्षीय नूर आलम यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर 34 वर्षीय प्रवीण पुजारी यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इतर जखमींमध्ये मुकेश गुप्ता (34), शिवमोहन (24), दीपाली गोडतकर (24), सना शेख (25), श्रीदेवी बंदीच्छोडे (31) आणि कमलेश जयस्वाल (22) यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हे ही वाचा…
नवी मुंबईतील कंपनीत गॅस गळती:कामगारांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम, 25 महिला बेशुद्ध; अनेकांची प्रकृती चिंताजनक
नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी गॅस गळतीची घटना घडली आहे. कार्बन मोनॉक्साईडच्या गळतीमुळे कंपनीतील तब्बल 25 महिला कामगार बेशुद्ध झाल्या असून, एकूण 27 जणांवर या विषारी वायूचा परिणाम झाला आहे. सर्व बाधितांना तात्काळ उपचारासाठी वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. पूर्ण बातमी वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.