
- Marathi News
- National
- ‘Divya Marathi’ Presents To The Great Family Of Mizoram, The World’s Largest Family Of 251 Members Is In The Hands Of Two Women
मनोजकुमार लस्कर | बक्तवांग (मिझोराम)20 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
येथे जगातील सर्वात मोठे कुटुंब आपल्या प्रमुखाच्या मृत्यूनंतरही चार वर्षांपासून सुखाने एकत्र नांदत आहे. हे कुटुंब मिझोराममधील बक्तवांग गावात राहते. कुटुंबात एकूण २५१ सदस्य आहेत. हे सर्व ५ मजली घराच्या ४२ खोल्यांमध्ये राहतात. १३ जून २०२१ रोजी त्याचे प्रमुख जिओना चाना यांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची सूत्रे पहिल्या दोन पत्नी लालरमचुआना आणि परलियाना (वरच्या फोटोत लाल वर्तुळात) यांनी घेतली. त्यांनी कुटुंबात सैन्यासारखे शिस्त लागू केली. पहाटे ३ वाजता अलार्म वाजतो. मग सामूहिक प्रार्थना, व्यायाम केला जातो. सकाळी ९:३० वा. नाष्टा, सायंकाळी ५ .३० वाजता जेवण. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने कुटुंबासोबत पूर्ण दिवस घालवून त्यांचे अतूट नाते जाणून घेतले…
समान संस्कार… हसूनच उत्तर देतातलालरमचुआना यांच्या मते, आपण एकमेकांचा आदर करायला आणि कुटुंबाप्रति जबाबदारी निभावणे शिकायला हवे. म्हणून दिवसातून एकदा आम्ही सर्वजण एकत्र नक्की बसतो. सर्वजण हळू आवाजात बोलतात. हसून उत्तर देतात. सर्व साक्षर आहेत. एक व्यक्ती निरक्षर राहिली तरी कुटुंब कमजोर होईल. कमाईचे पैसे आमच्याकडे राहतात. गरज असते तेव्हा पैसे दिले जातात. जिओना यांची १८ वर्षांची नात टेटे म्हणते, “हसून उत्तर देण्याची परंपरा आजोबांनी सुरू केली. आम्ही आधुनिक आहोत. पण जुने संस्कार जपले आहेत. कारण ती आमची मूळ ओळख आहे.
व्यवस्थापनाचा फॉर्म्युला सर्वांची सोबत हवीजिओना यांना ३९ पत्नींपासून ७५ मुले झाली. ५ पत्नी आता हयात नाहीत. ३० मुले, ४५ मुली आहेत. ७६ वर्षीय लालरमचुआना ७४ वर्षीय परलियाना यांना सर्वांत ज्येष्ठ असल्यामुळे नेतृत्व मिळाले. पुरुष शेती-व्यवसाय करतात. ५ सदस्य सरकारी शिक्षक आहेत. कुटुंबाचा फर्निचर, ॲल्युमिनियम, अगरबत्ती आणि बांबू हस्तकला उद्योग आणि टू व्हीलर वर्कशॉप आहे. यातून दरमहा ७ लाख रुपयांपर्यंत कमाई होते. टूर ऑपरेटर पर्यटकांना आणतात. यातून कुटुंबाला अतिरिक्त उत्पन्न मिळते.
३४ पत्नी, ७१ मुले, १४६ नातू-पणतू, पण जीवनमंत्र एकच- हृदयात केवळ कुटुंब
मेगा किचन अन् मासिक खर्च… घरखर्चाचा हिशेब दर महिन्याच्या ३ तारखेला होतो. सर्वजण एकत्रित बसून तो करतात. १५ हजार चौरस फुट जागेपैकी १० हजार चौरस फुटांचे स्वयंपाकघर आहे. येथे ३४ पत्नी, ७१ मुले, १४६ नातवंडांसाठी जेवण तयार होते. यांच्यासाठी रोज ९० किलो तांदूळ, ३० किलो बटाटे, तेवढ्याच भाज्या आणि विशेष दिवशी ३० कोंबड्या लागतात. महिन्याला ४ लाख रुपये खाण्यापिण्यावर खर्च होतात.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.