digital products downloads

मिरा-भाईंदरमध्ये आगीचे तांडव: प्लेझंट पार्कमधील 4 ते 5 इमारतींना लागली आग, सिलेंडरच्या स्फोटाने आग लागल्याची शक्यता; VIDEO – Mumbai News

मिरा-भाईंदरमध्ये आगीचे तांडव:  प्लेझंट पार्कमधील 4 ते 5 इमारतींना लागली आग, सिलेंडरच्या स्फोटाने आग लागल्याची शक्यता; VIDEO – Mumbai News



मुंबईला लागून असलेल्या मिरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात सोमवारी रात्री आगीचे भीषण तांडव पाहायला मिळाले. एकापाठोपाठ झालेल्या स्फोटांमुळे लागलेल्या या आगीने रौद्ररूप धारण केले असून, परिसरातील तब्बल ४ ते ५ इमारती आगीच्या विळख्यात सापडल्या आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम अद्यापही युद्धपातळीवर सुरू आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्लेझंट पार्क परिसरात रात्रीच्या शांततेत अचानक आगीचा भडका उडाला. काही वेळातच आगीने भीषण स्वरूप धारण केले. आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, बाजूला असलेल्या चार-पाच इमारतींना या आगीची झळ बसली. परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरल्याने रहिवाशांमध्ये मोठी घबराट पसरली असून अनेकांनी जीवाच्या आकांताने इमारतीबाहेर धाव घेतली. सिलिंडर स्फोटाचा संशय; टेम्पो खाक आगीचे नेमके कारण अद्याप प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र, प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग पसरली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी केवळ इमारतीच नव्हे, तर परिसरात उभे असलेले २ ते ३ टेम्पो देखील आले असून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र मालमत्तेचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अरुंद रस्ते आणि धुराचे लोट यामुळे आग विझवताना जवानांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतरही आग पूर्णपणे आटोक्यात आलेली नव्हती. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित केला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp