
सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला हाणला. मी डॉक्टर नाही, पण छोटे-मोठे ऑपरेशन करतो. माझे फार काही शिक्षण झाले नसले तरी 2022
.
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी पालघरमध्ये महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या राज्य अधिवेशनाचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच शिक्षणाचे महत्त्वही अधोरेखित केले. ते म्हणाले, मी बारावीनंतर शिक्षण सोडले. पण मुलाला डॉक्टर केले. कारण, एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफूल वेपन विच यू कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शिक्षणावर विशेष भर दिला आहे. नवीन शैक्षणिक धोरण हा त्याचाच एक परिपाक आहे. शिक्षकांना वंदन करायचे नाही, तर कुणाला करायचे?
शिक्षक आपल्या सर्वच वैयक्तिक समस्या पोटात घालून भावी पिढ्यांना घडवण्याचे काम करतात. त्यामुळे ते महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची भावी पिढी घडवणारे खरे शिल्पकार आहेत. आई-वडिलांनंतर शिक्षकांचाच व्यक्तीच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका असते, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पेसा शिक्षक निर्णय पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत निकाली लागण्याचेही संकेत दिले.
2022 मध्ये गुवाहाटीला परीक्षा दिली
एकनाथ शिंदे यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, माझे फार काही शिक्षण झाले नाही. पण लोकांमध्ये मिसळल्यानंतर मला खरे शिक्षण मि्ळाले. मी डॉक्टर नाही. पण छोटी-मोठी ऑपरेशन करोत. शिक्षण नसले तरी मी 2022 मध्ये परीक्षा देण्यासाठी गुवाहाटीला गेलो होतो. आता थोडे फार शिल्लक राहिले आहे. ते ही लवकरच पूर्ण होईल. आम्ही प्रिंटिंग मिस्टिकवाले नाही, तर वचननाम्यानुसार आश्वासन पाळणारे आहोत.
गुरू प्रत्येकाला लागतो. गुरूशिवाय काही नाही. समाजाचा दोष दूर करण्यासाठी गुरू हवा असतो. शिक्षक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कुणाला पुढे न्यायचे? कुणाचा टांगा पलटी करायचा हे आम्हाला माहिती आहे. शिक्षक आमदार शिक्षकांच्या समस्या सोडवतील. मी तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही. पण महाराष्ट्रातील जनतेला सोन्याचे दिवस आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.
हे ही वाचा…
आर्मी पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास तयार:पण सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, प्रकाश आंबेडकर यांचा मोदी सरकारवर आरोप
पुणे – पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर देण्यास तयार आहे. पण सरकारमध्ये असे काही करण्याची राजकीय इच्छाशक्ती दिसत नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधताना केली. वाचा सविस्तर
2034 पर्यंत फडणवीसच मुख्यमंत्री:बावनकुळेंच्या दाव्यावर शिंदेंनी जोडले हात; कदम म्हणाले – 2034 कशाला 2080 पर्यंत राहू द्या!
मुंबई – भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस हेच 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहतील असा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यावर माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘हात जोडत’ बोलणे टाळले, तर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी 2034 कशाला 2080 पर्यंत त्यांना मुख्यमंत्री राहू द्या असे म्हणत भाजपला असा टोला हाणला आहे. त्यामुळे महायुतीत या मुद्यावरून मोठी ताणातान होण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.