
Manoj Jarange Maratha Morcha: मुंबईत सध्या गणेशोत्वसाचा माहोल आहे. दक्षिण मुंबईतील विविध मंडळाचे गणपती बघण्यासाठी व बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी तोबा गर्दी उसळली आहे. मुंबईत गणेशोत्सवाची धूम असतानाच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानात उपोषण सुरू केलं आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी फोर्ट परिसरात अनेक आंदोलकांनी ठिय्या मांडला आहे. फोर्ट परिसरात आंदोलन सुरू असल्याने, बेस्ट बसच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यास अडचणी येत आहेत. परिणामी, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.
मुंबईत गणेशोत्सवादरम्यान गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. नेमके त्याचदरम्यान आंदोलनाच्या निमित्ताने मराठा आंदोलक सीएसएमटी परिसरात दाखल झाले. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी अनेक मार्ग बंद केले आहेत. तसेच वाहनधारकांनाही मोठी कसरत करत पर्यायी मार्गाने जावे लागेल.
असे आहेत बदल?
बेस्ट बस मार्ग क्रमांक 135,50 भाऊ धक्का रोडऐवजी माझगाव येथून वळवण्यात आली आहे. बेस्ट बस मार्ग क्रमांक 46 काळाचौकी, बस मार्ग 504,502, 501, 521, 1-33, 507 मानखुर्द येथील शीव-पनवेल महामार्गावरील बस सेवा महाराष्ट्र नगर पुलावरून चालवण्यात येत आहे. बेस्ट बस मार्ग क्रमांक14, 28, 66,69,126 महापालिका मार्गाऐवजी महात्मा फुले मार्केट येथून चालवण्यात येत आहे.
बस मार्ग क्रमांक
बेस्ट बस मार्ग क्रमांक 5, 15, 83, 86, 88 महात्मा गांधी मार्ग
132 तात्पुरता बंद बेस्ट बस मार्ग क्रमांक 9, 14, 103, 124, 83 महात्मा गांधी मार्गावरून चालवण्यात येत आहे. बेस्ट बस मार्ग क्रमांक ए-1,ए-126, ए-126, ए-45, ए-26 सीएसएमटीऐवजी डी. एन. रोडवरून चालवण्यात येत आहे. तर, बेस्ट बस मार्ग क्रमांक 132 तात्पुरत्या कालावधीसाठी बंद करण्यात आला आहे.
बेस्ट बस मार्ग क्रमांक ए-26 ही ए-19 या मार्गावरून चालवण्यात येत आहे. बेस्ट बस मार्ग क्रमांक 46, 50 बेरिष्टर नाथ पै मागएिवजी काळाचौकी मार्गे चालवण्यात येत आहे. बेस्ट बस मार्ग क्रमांक 66. 124, 125 सीएसएमटीऐवजी मुंबई सेंट्रलमार्गावरून चालवण्यात येत आहे. बेस्ट बस मार्ग क्रमांक 164 महाराणा प्रताप चौकऐवजी मुंबई सेंट्रल येथून चालवण्यात येत आहे. बेस्ट बस मार्ग क्रमांक 66, ए-30 सीएसएमटीऐवजी भारत माता येथून चालवण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकरांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
FAQ
बेस्ट बस मार्गांमधील बदलांचा प्रवाशांवर काय परिणाम होत आहे?
मार्ग बदलांमुळे आणि काही मार्ग बंद झाल्याने प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी अडचणी येत आहेत. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे, कारण त्यांना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागत आहे.
2. मराठा आंदोलनामुळे कोणते मार्ग बंद आहेत?
मराठा आंदोलनामुळे फोर्ट परिसर आणि सीएसएमटी परिसरातील अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत. यामध्ये सायन-पनवेल मार्ग, पांजरपोळ मार्ग आणि आझाद मैदान परिसरातील रस्ते यांचा समावेश आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी पूर्व मुक्त मार्ग (ईस्टर्न फ्रीवे) टाळण्याचा सल्ला दिला आहे.
3. गणेशोत्सवामुळे वाहतूक व्यवस्थेत कोणते बदल झाले आहेत?
गणेशोत्सवामुळे 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. गिरगाव, लालबाग, दादर-शिवाजी पार्क, जुहू चौपाटी, मालाड-मार्वे आणि बोरिवली जेट्टी परिसरात विसर्जनावेळी गर्दी अपेक्षित असल्याने हे मार्ग टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, कोस्टल रोड, ईस्टर्न फ्रीवे आणि उड्डाणपुलांचा वापर करून प्रवास नियोजित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.