
Vasai Uttan Dongri Ro Ro Service: मुंबईकरांसाठी लवकरच वाहतुकीसाठी एक नवीन पर्याय समोर आला आहे. रो-रो सेवा सुरू करण्यासाठी वसई खाडी ते नागला पोर्ट आणि उत्तान डोंगरीमध्ये जेटीचे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने येत्या काळात वसई खाडीत नागला पोर्ट आणि पश्चिम किनार पट्टीवरील उत्तन डोंगरी येथे येत्या काळात रो-रो सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याअंतर्गंत दोन्ही ठिकाणी जेट्टी बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाला कोस्टल रेगुलेशन झोन (CRZ) कडून मंजुरी मिळाली आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील किनारी भाग प्रवाशांसी जोडण्याची योजना बनवली आहे. महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डांकडून याची चाचपणी सुरू आहे. या अंतर्गंत किनारी भागांवर जेट्टी उभारण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त उत्तन डोंगरी आणि नागला पोर्टवर रो-रो सेवांसाठी जेट्टी बनवण्यासाठी सीआरझेडकडून महत्त्वपूर्ण मंजुरी मिळवली आहे.
नागला पोर्ट आणि उत्तन दोन्ही ठिकाणी 143 मीटर लांबी आणि 10 मीटर रुंदीची जेट्टी बनवण्यात येणार आहे. ही जेट्टी सगळ्यात लांबीची असून रो-रोसारखे मोठे जहाज तिथे उभे करण्यात येणार आहेत. तसंच, जल वाहतुकीसाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून आणखी एक दोन ठिकाणी मोठे केंद्र उभारले जाणार आहेत. यासाठी जेट्टीव्यतिरिक्त पार्किंग स्थळ आणि एक सुरक्षा भिंतदेखील उभारण्यात येणार आहे.
ठाणे, नवी मुंबईकरांसाठीदेखील योजना, नवी मुंबई-ठाणेकरांना कसा होईल फायदा?
महाराष्ट्र्र मेरीटाइम बोर्डाने ठाणे आणि नवी मुंबई क्षेत्रातदेखील चार जेटी बनवण्याची योजना बनवली आहे.
यात वाशी, ऐरोली, मुलुंड मीठानगर क्षेत्र आणि ठाण्यातील चेंदानी कोळीवाडाजवळ मीठबंदर आहे. मात्र इथे वन विभागाने अद्याप परवानगी दिली नसल्याने प्रस्ताव आत्तापर्यंत एमसीजेडएमएकडून ठेवला नाहीये. जर हा प्रस्ताव स्वीकार झाला तर ठाणे, नवी मुंबई, वसईपर्यंत मुंबईच्या उत्तर-पश्चिम तट जोडली जाणार आहेत. प्रस्ताव मंत्रालयाच्या संबंधित अधिकाऱ्यांना पाठवला आहे.
FAQ
1. वसई-उत्तन डोंगरी रो-रो सेवा म्हणजे काय?
महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने (MMB) सुरू करणारी ही जलवाहतूक सेवा आहे, ज्यात रो-रो (Roll-on/Roll-off) फेरीद्वारे वसई खाडी ते नागला पोर्ट आणि उत्तन डोंगरी दरम्यान प्रवास होईल. याचा उद्देश मुंबई आणि आसपासच्या भागातील वाहतूक कमी करणे आणि जलमार्गाने जलद प्रवास उपलब्ध करणे आहे.
2. ही सेवा कधी सुरू होणार आहे?
सेवेच्या सुरुवातीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. सध्या नागला पोर्ट आणि उत्तन डोंगरी येथे जेट्टी बांधकामाच्या हालचाली सुरू आहेत. CRZ मंजुरी मिळाल्यानंतर लवकरच बांधकाम सुरू होईल आणि सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
3. कोणत्या ठिकाणी जेट्टी बांधल्या जाणार आहेत?
नागला पोर्ट (वसई खाडी) आणि उत्तन डोंगरी (पश्चिम किनारपट्टी) येथे जेट्टी बांधल्या जाणार आहेत. दोन्ही ठिकाणी 143 मीटर लांबी आणि 10 मीटर रुंदीच्या जेट्टी उभारल्या जातील, ज्या रो-रो जहाजांसाठी योग्य असतील.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.