digital products downloads

मुंबईच्या गोरेगावात दोन गटांत राडा: पोलिसांची आरोपींच्या घरावर चालवला बुलडोझर, सोमय्या घटनास्थळी पठण करणार हनुमान चालीसा – Maharashtra News

मुंबईच्या गोरेगावात दोन गटांत राडा:  पोलिसांची आरोपींच्या घरावर चालवला बुलडोझर, सोमय्या घटनास्थळी पठण करणार हनुमान चालीसा – Maharashtra News



गोरेगावच्या दिंडोशी परिसरात रविवारी रात्री दोन गटांत तुफान राडा झाला. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना पोलिसांनी आज सकाळी चोख बंदोबस्त या घटनेतील आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवून आपला खाक्या दाखवला. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या घटनास्थळी जाऊन हनुमान चालीसा म्हणणार आहेत. त्यामुळे या प्रकरणी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, गोरेगावच्या दिंडोशी येथील संतोष नगर मार्केट परिसरात रविवारी रात्री मरियम माता शोभा यात्रा निघाली होती. त्यावेळी तेथील दोन गटांत वाद झाला. त्यात बजरंग दलाचे 3 कार्यकर्ते जखमी झाले. तर अनेक जण जखमी झाले. जखमींना जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपींची ओळख पटवून 8 जणांना अटक केली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी त्यांनी सौम्य बळाचाही वापर केला. या घटनेनंतर संतोष नगर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामुळे या भागाला पोलिस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. सध्या येथे तणावपूर्ण शांतता आहे. पोलिस स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दुसरीकडे, संतोष नगर परिसरातील अनधिकृत बांधकामाबाबत पोलिसांकडे यापूर्वीच अनेक तक्रारी आल्या होत्या. कालच्या राड्यानंतर पोलिसांनी या तक्रारींची शहानिशा केली. त्यात या घटनेतील आरोपींची घरे अनधिकृत असल्याची बाब स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी आज सकाळी महापालिकेच्या मदतीने त्यांच्या घरावर बुलडोझर चालवला. यामुळेही येथील तणावात अधिकची भर पडली. किरीट सोमय्या पठण करणार हनुमान चालीसा दुसरीकडे, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज सायंकाळी घटनास्थळी हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना झालेली मारहाण व अनधिकृत वस्त्यांमधील आरोपींची नावे पुढे आल्याने सोमय्या यासंबंधी आक्रमक झालेत. आता पोलिस सोमय्यांच्या भूमिकेवर काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp