digital products downloads

मुंबईच्या सांताक्रूझ येथे सिलिंडर स्फोटामुळे भीषण आग: चौघे गंभीर जखमी; तिघांची प्रकृती चिंताजनक – Mumbai News

मुंबईच्या सांताक्रूझ येथे सिलिंडर स्फोटामुळे भीषण आग:  चौघे गंभीर जखमी; तिघांची प्रकृती चिंताजनक – Mumbai News



मुंबईच्या सांताक्रूझ (पूर्व) येथील वाकोला ब्रिज परिसरातील दिघे चाळीत गुरुवारी संध्याकाळी घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत चार जण गंभीररित्या भाजले आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारांसाठी शीण (LTMG) रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ​प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ पूर्व येथील धोबी घाट, दिघे चाळ (रेखा मेडिकलच्या मागे) येथे 19 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 18:52 वाजता सिलिंडर स्फोटाची पहिली माहिती नियंत्रण कक्षाला प्राप्त झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई अग्निशमन दलाने (MFB) तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून 19:26 वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. ​या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सदस्यांसह एकूण चार जण होरपळले आहेत. घटनेनंतर जखमींना तातडीने वाकोला येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, जखमींची प्रकृती आणि भाजल्याची तीव्रता लक्षात घेता, व्ही. एन. देसाई रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तीन रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली आणि रुग्णवाहिकेसह लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालय (शीण) येथे हलवण्यात आले आहे. ​जखमींमध्ये 30 वर्षीय जावेद अब्दुल शेख सर्वाधिक 60 टक्क्यांपर्यंत भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तसेच 45 वर्षीय अवंतिका अजय गावडे (30 टक्के भाजलेल्या) आणि 65 वर्षीय सुमती रमेश गावडे (35 ते 40 टक्के भाजलेल्या) यांनाही शीण रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. तर 15 वर्षीय यश गावडे हा 10 ते 12 टक्के भाजला असून, त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. यशवर सध्या व्ही. एन. देसाई रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp