
मुंबईतील जोगेश्वरीमध्ये एका उंच इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. जोगेश्वरी पश्चिममधील जेएनएस बिझनेस पार्क या व्यावसायिक इमारतीला लागलेल्या आगीत चार मजले विळख्यात सापडले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने शर्थीचे प
.
मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी पश्चिमेकडील बेहराम बाग येथील गांधी शाळेजवळील एस.व्ही. रोडवरील जेएनएस बिझनेस पार्कमध्ये ही आग लागली होती. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला सकाळी १० वाजून ५१ मिनिटांनी मिळाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. ही आग इतकी भीषण होती की इमारतीचे ४ मजले तिच्या विळख्यात सापडले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाने या घटनेला लेव्हल-२ ची आग म्हणून घोषित केले.
इमारतीत अडकलेल्या लोकांचा मदतीसाठी धावा
आग लागल्यानंतर इमारतीच्या वरच्या मजल्यांवर काही लोक अडकले होते. त्यांनी मदतीसाठी हाका मारल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत एका बाजूला आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले, तर दुसऱ्या बाजूला इमारतीत अडकलेल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. अथक प्रयत्नांनंतर ही आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुखापत झालेली नाही.
आगीचे कारण अस्पष्ट
दरम्यान, ही इमारत व्यावसायिक असून, आत अनेक कार्यालये आहेत. इमारतीला लागलेल्या आगीचे कारण अद्याप निश्चित झालेले नाही; मात्र शॉर्ट सर्किटची शक्यता नाकारता येत नाही. आगीमुळे धुराचे लोट पसरल्याने परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.
नवी मुंबईत दोन दिवसांपूर्वी आगीच्या घटना
दरम्यान, नवी मुंबईत केवळ दोन दिवसांपूर्वी दोन आगीच्या घटना घडल्या होत्या. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. अलीकडेच शहरात वारंवार आग लागण्याच्या घटनांमुळे मुंबईकरांमध्ये चिंता वाढली आहे
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



