
Manoj Jarange Maratha Morcha Mumbai Protesters Bath On Road: मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगेंबरोबर हजारो मराठा आंदोलक पहाटेच्या सुमारास नवी मुंबईमधून मुंबई शहरात दाखल झाले. मनोज जरांगे प्रवास करत असलेली कार सकाळी साडेनऊच्या सुमारास आझाद मैदान परिसरामध्ये दाखल झाली. या आंदोलनाला एका दिवसाचा कालावधी आणि पाच हजार लोकांच्या उपस्थितीची अट घालून देण्यात आली असली तरी आंदोलकांची संख्या प्रचंड असल्याने त्यांना मूलभूत सुविधा अपुऱ्या पडल्याचं दिसून आलं. त्यामुळेच अनेक आंदोलकांनी रस्त्यांवरच अंघोळ केल्याचं चित्र पाहायला मिळालं.
कालपासून सुरु होता प्रवास
गुरुवारी दुपारी शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये शिवनेरीवरील माती माथ्याला लावत प्रवासाला सुरुवात केलेल्या जरांगेचा ताफा मंचर, राजगुरुनगर, तळेगाव, लोणावळा मार्गे एक्स्प्रेस वेवरुन नवी मुंबईत दाखल झाला. साडेसहा हजार गाड्या असलेला हा ताफा पहाटे मुंबईत शिरला. प्रचंड जनसमुदाय आणि तितक्याच गाड्या यामुळे फ्री वेवरही मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली. अखेर नऊच्या सुमारास केवळ जरांगेच्या कारला आझाद मैदानाजवळ प्रवेश देण्यात आला आणि जरांगे आझाद मैदानावर उभारण्यात आलेल्या स्टेजवर पोहोचले. तिथून त्यांनी भाषण करताना गुलाल माथ्यावर लागल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही, असं सांगताना समर्थकांना पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं.
आंदोलकांची गैरसोय
मनोज जरांगेंनी आंदोलकांना पोलिसांना सहकार्य करत गाड्या पार्किंगच्या ठिकाणी लावाव्यात असं सांगितलं. तसेच दुपारपर्यंत मुंबई रिकामी करा आपल्यामुळे मुंबईकरांना त्रास नको असं सांगत परतण्याचा सल्ला दिला. तसेच मनोज जरांगेंनी शिस्त पालन करण्याचं आवाहन आंदोलकांना केलं. दुसरीकडे पुरेश्या सुविधा नसल्याने अनेक आंदोलकांच्या अंघोळीची आणि इतर सुविधांची गैरसोय झाली.
नक्की वाचा >> ‘पुढील दोन तासांत मुंबई…’, खचाखच भरलेल्या आझाद मैदानात जरांगेंचं भाषण; ‘जाळपोळ, दगडफेक…’
कृत्रिम डबक्यातही अंघोळ
एका आंदोलकानेच तर मैदानामधील एका छोट्याश्या कृत्रिम डबक्यामध्ये अंघोळ केली. या गोलाकार रबरी डबक्याच्या सर्व बाजूंनी छोटीछोट्या फुल झाडांची सजावट करण्यात आलेली. यामध्ये उतरुन या आंदोलकाने थेट कंबरेभोवती टॉवेल गुंडाळून अंघोळ केल्याचं पाहायला मिळालं.
नक्की वाचा >> फक्त मराठा आरक्षण नाही तर जरांगेंनी केल्यात ‘या’ 6 मागण्या; एक मागणी धनंजय मुंडेंसंदर्भात
रस्त्यावर अंघोळ
अनेक आंदोलकांनी मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळ टँकरमधील पाण्याने रस्त्यावर अंघोळ उरकून घेतल्याचं दिसून आलं. आझाद नगर मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वाहतूक बंद करण्यात आल्याने आंदोलक या रिकाम्या रस्त्यांवर बसून होते. काही आंदोलकांनी या रस्त्यावर थेट झोप काढून घेतली. आरबीआय मुख्यालयाचा चौक, फॅशन स्ट्रॅटचा रस्ता येथे आंदोलक रस्त्यावर बसून होते. आंदोलकांचे हे व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. मोठ्या संख्येनं आंदोलक आझाद मैदानावर उपस्थित आहेत.
Maratha aandolak | मुंबईतील रस्त्यावरच अंघोळी अन् तिथेच आराम… Maratha Reservation Morcha चे Video Viral
.
.
.#manojjarangepatil #marathinews #marathareservation #navnathban #bjp #marathinews #sanjayraut pic.twitter.com/s0yl1Zl8ue— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 29, 2025
FAQ
मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलन कधी सुरू झालं?
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केलं. त्यांचा ताफा सकाळी साडेनऊ वाजता आझाद मैदानात पोहोचला.
जरांगे यांचा मोर्चा मुंबईत कसा पोहोचला?
27 ऑगस्ट 2025 रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून साडेसहा हजार गाड्यांचा ताफा घेऊन जरांगे यांनी मोर्चा सुरू केला. 28 ऑगस्ट रोजी दुपारी शिवनेरी (जुन्नर) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानावरील माती कपाळी लावून त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. मंचर, राजगुरुनगर, तळेगाव, लोणावळा मार्गे पहाटे नवी मुंबईत आणि नंतर आझाद मैदानात ते पोहोचले.
नक्की वाचा >> मनोज जरांगे आहेत तरी कोण? त्यांनी खरोखर जमीन विकली का? मराठ्यांसाठी लढणाऱ्या जरांगेंचा संपूर्ण Biodata
आंदोलकांनी रस्त्यावर आणि डबक्यात अंघोळ का केली?
पुरेशा सुविधा नसल्याने आंदोलकांना अंघोळीसाठी अडचणी आल्या. त्यामुळे काहींनी मेट्रो सिनेमाजवळ टँकरच्या पाण्याने रस्त्यावर, तर एका आंदोलकाने आझाद मैदानातील फुलझाडांनी सजवलेल्या रबरी डबक्यात अंघोळ केली. ही दृश्ये व्हायरल झाली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.