digital products downloads

मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये चोरांच्या टोळ्या! रोज ‘इतके’ मोबाईल करतात लंपास; ‘हे’ स्टेशन सर्वात डेंजर

मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये चोरांच्या टोळ्या! रोज ‘इतके’ मोबाईल करतात लंपास; ‘हे’ स्टेशन सर्वात डेंजर

Mumbai Local Train Mobile Theft: मुंबई लोकल ट्रेनच्या जीवावर धावते असं म्हणतात. म्हणूनच लोकल ट्रेनला देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची लाईफलाईन म्हणून ओळखले जातं. सध्याच्या स्मार्टफोनच्या जगात मुंबई लोकल असो किंवा कोणताही प्रवास असो स्मार्टफोन हा सर्वात उत्तम विरंगुळा असतो. हा स्मार्टफोनच त्यांना कुटुंब, काम आणि जगाशी जोडतो. मात्र याच स्मार्टफोनवर लोकल ट्रेनमध्ये डल्ला मारण्याचे प्रकार मागील काही काळापासून वाढले आहेत. ट्रेनमध्ये चोरीला जाणाऱ्या मोबाईलसंदर्भातील थक्क करणारी आकडेवारी समोर आली आहे. 

मोबाईल चोरीची आकडेवारी समोर

2022 पासून आजपर्यंत, सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी), मुंबई येथे फोन चोरीचे 37 हजार 398 गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र त्यापैकी फक्त 16 हजार 154 प्रकरणांमध्ये हरवलेले मोबाईल सापडले आहेत. सामान्यतः गर्दीच्या गाड्या आणि प्लॅटफॉर्मवर मोबाईल चोरीला जातात. केवळ 2023 मध्ये 12 हजार 989 फोन चोरीच्या घटना घडल्याचं आकडेवारीमधून स्पष्ट होत आहे. 2023 च्या तुलनेत आता मोबाईल चोरीला जाण्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे.

सर्वात डेंजर स्टेशन कोणत?

जीआरपीच्या आकडेवारीनुसार, बहुतेक चोरीच्या घटनांमध्ये कुर्ला स्थानक आघाडीवर आहे. कुर्ल्याबरोबरच कल्याण स्थानकामध्येही मोबाईल चोरीचं प्रमाण इतर स्थानकांपेक्षा अधिक आहे. विरोधाभास म्हणजे सर्वाधिक पोलीस बंदोबस्त असलेल्या स्थानकांमध्ये कल्याण आणि कुर्ल्याचा समावेश असतानाही तिथेच मोबाईलच्या सर्वाधिक चोऱ्या होतात.

आठवड्याला किती मोबाईल चोरी होतात?

मुंबई लोकल ट्रेनमधून दर दिवशी साधारणपणे 18 ते 20 महागडे मोबाईल चोरीला जातात. म्हणजेच दर आठवड्याला सरासरी 135 ते 140 फोन चोरीला जातात. म्हणजेच दर महिन्याला लोकल ट्रेनमध्ये चोरीला जाणाऱ्या मोबाईलची संख्या ही 950 मोबाईलच्या आसपास आहे.

टोळ्या सक्रीय

“चौरीच्या एकूण घटनांपैकी बऱ्याच घटना चोरांच्या छोट्या टोळ्यांच्या मार्फत घडतात. या टोळ्या एकत्र काम करतात. आम्ही अलीकडेच अशा एका टोळीच्या सदस्याला पकडले आहे. जेव्हा टोळीतील असा एखादा सदस्य पकडला जातो तेव्हा अशी चोरीची प्रकरणे क्षणार्धात कमी होतात कारण हे लोक दिवसातून अनेक फोन चोरतात,” असे रेल्वे पोलिस गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

ट्रेनमधून उतरल्यावर चोरीचं समजतं पण…

बहुतेकांना ट्रेनमधून उतरल्यानंतरच त्यांचा फोन हरवल्याचे लक्षात येते. त्यामुळे चोरी कुठे झाली हे नेमके ठिकाण शोधणे कठीण होते. “पीडीत व्यक्तीला फोन हरवल्याचे लक्षात आल्यावर आम्ही स्टेशनवर एफआयआर नोंदवतो आणि तिथून तपास करतो,” असं पोलीस सांगतात. “जर एखाद्याच्या समोर फोन हिसकावून घेतल्याची स्पष्ट दरोडा असेल तर आम्ही सीसीटीव्ही फुटेज त्वरित पाहू शकतो आणि गुन्हेगाराची ओळख पटवू शकतो,” असंही पोलिसांनी सांगितलं.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp