digital products downloads

मुंबईत गोंधळ घालाणाऱ्या मराठा आंदोलकांना पहिला सर्वात मोठा झटका! हायकोर्टात याचीका दाखल

मुंबईत गोंधळ घालाणाऱ्या मराठा आंदोलकांना पहिला सर्वात मोठा झटका! हायकोर्टात याचीका दाखल

Maratha Reservation Manoj Jarange Patil Morcha : मुंबईत गोंधळ घालाणाऱ्या मराठा आंदोलकांना पहिला सर्वात मोठा झटका बसला आहे. मुंबई हायकोर्टात याचीका दाखल करण्यात आली आहे. आंदोलन बेकायदेशीर असल्याचा दावा  या याचिकेत करण्यात आला आहे. नागरिकांना त्रास होत असल्याचे देखील याचिकेत म्हंटले आहे.  आजच याचिकेवर सुनावणी होणार आहे.  एमी फाउंडेशनने दाखल केलेल्या या याचिकेवर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र घुगे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

आझाद मैदानावर झालेल्या प्रचंड जनसमुदायाने दक्षिण मुंबई संपूर्ण गोंधळात टाकली आहे. अनियंत्रित रहदारी आणि वाढत्या गर्दीमुळे शहर ठप्प झाले आहे. दैनंदिन जीवन आणि व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे. दुकाने आणि बाजारपेठांमधील आठवड्याच्या शेवटी विक्री नगण्य पातळीवर घसरली आहे,. ज्यामुळे व्यापारी आणि व्यावसायिक मालक हतबल झाले आहेत. व्यावसायिक बैठका पुढे ढकलल्या जात आहेत, कार्यालये विस्कळीत होत आहेत आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. हा गतिरोध चालू राहू शकत नाही. सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी सरकारी चर्चा किंवा उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाची तातडीने आवश्यकता आहे. अन्यथा, दक्षिण मुंबईच्या व्यवसायाचे आणि उपजीविकेचे दीर्घकालीन नुकसान विनाशकारी असेल. मुंबई हायजॅक झाल्यासारखी वाटते आहे असा संताप  फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे (FRTWA) अध्यक्ष विरेन शाह यांनी व्यक्त केला आहे. 

एकीकडे जरांगे निर्जळी उपोषण करतायत मात्र दुसरीकडे मराठा आंदोलक हुल्लडबाजी करताना दिसात आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून आरक्षणाच्या मागणीसाठी आणि जरांगे पाटलांन समर्थन देण्यासाठी हजारो मराठी आंदोलक मुंबईत गेल्या चार दिवसांपासून  ठिय्या मांडून आहेत. आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहोत असं म्हणत अनेक आंदोलनकर्ते सध्या जीवाची मुंबई करताना दिसतायत. प्रातर्विधी उरकून, रस्त्यावर लावलेल्या टँकरखाली  आंघोळ्या करून कोणी थेट मरीन ड्राईव्हवर समुद्रावरील हवेचा,  अथांग समुद्र पाहण्याचा आनंद घेतायत.  तर,काही आंदोलक   सीएसटीमच्या प्लॅटफॉर्मवर   शड्डू ठोकत  कुस्ती, कबड्डी, खोखोचे  डाव टाकतायत, तर काही ठिकाणी लिंबू फोडी, बॅरीकेटसवर घोडागाडी खेळण्याचे प्रकार सुरु आहेत, शिवाय साथसोबतीला हलगीचा नादही निनादतोय. तर एकंदरीतच आंदोलनकर्त्यांची अक्षरश:  मुंबईत गोंधळ घताला आहे.  

दरम्यान, यापूर्वीच मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाविरोधात सदावर्तेंनी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती. कोर्टानं सदावर्तेंच्या बाजून निर्णय देत. मुंबईतील आंदोलनाला मनाई केली. तसेच नवी मुंबईतील आंदोलनासाठीही परवानगी घ्यावी लागणार असल्याचं सदावर्ते म्हणाल होते. जरांगेंनी कोर्टाचा आदेश मानला नाही तर कोर्टाचा अवमान होईल. कोर्टाच्या आदेशाविरोधात जरांगे काहीही करु शकत नाही असं याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटल होते. असे असताना जंरागे यांचे मुंबईत आंदोलन सुरु आहे. 

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp