
मुंबईत अनेक ठिकाणी गटारे नियमितपणे स्वच्छ करण्यात येत असूनही नागरिकांकडून पुन्हा त्यामध्ये कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत. विशेषतः मान्सूनच्या काळात पाणी तुंबणे टाळण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आता गटाऱ्यात औद्योगिक कचरा टाकणाऱ्यांविरोधात कठ
.
धारावीतील ‘टी जंक्शन’ येथील गटार पूर्वीच साफ केले गेले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा मोठ्या प्रमाणात औद्योगिक कचरा आढळून आला. यावर कारवाई करत बीएमसीने शाहूनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायदंड संहिता कलम 326(C) (खोडसाळ कृत्य) अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.
नाल्यांच्या स्वच्छतेसाठी एआयचा वापर
महापालिकेच्या सफाई मोहिमेचा एक भाग म्हणून, मुंबई महानगर क्षेत्रातील नद्यांमध्ये आणि ओढ्यांमध्ये सातत्याने कचरा सापडतो. या समस्येवर उपाय म्हणून बीएमसीने आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीच्या साहाय्याने नियोजित पद्धतीने कचरा हटवण्याचे काम सुरू केले आहे.
AI मुळे कामाच्या कार्यक्षमतेत आणि पारदर्शकतेत वाढ झाली असून, पालिकेचे वरिष्ठ अधिकारी पूर्व उपनगर, पश्चिम उपनगर आणि शहर भागात नियमित तपासण्या करत आहेत. लहान-मोठ्या नाल्यांमधील स्वच्छता अजूनही पूर्ण झाली नसून, पावसात गटाऱ्यांच्या कडेला साचणाऱ्या कचऱ्यामुळे वारंवार सफाई करणे आवश्यक झाले आहे.
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील विभागातील गटारांमध्ये थर्माकोल, रबरी वस्तू, प्लास्टिक रॅपर्स, पार्सल बॉक्सेस यांसारख्या विविध औद्योगिक आणि अनधिकृत वस्तू सापडल्या आहेत. अशा कृत्यांमुळे पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमध्ये अडथळे निर्माण होतात आणि पावसात तुंबणाऱ्या पाण्याची समस्या वाढते.
प्रयोग म्हणून जाळ्यांचा वापर
पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होऊ नये म्हणून काही निवडक ठिकाणी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही काही व्यक्ती व व्यावसायिक संस्था प्लास्टिक, फर्निचर, थर्माकोल यांसारख्या तरंगणाऱ्या वस्तू गटारांमध्ये टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणी साचून वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.
औद्योगिक आणि इतर घनकचरा गटाऱ्यांमध्ये टाकण्याची कृती ही गंभीर स्वरूपाची असून, आपत्कालीन व्यवस्थापनात अडथळा निर्माण करणारी आहे. त्यामुळे पालिकेने कडक धोरण राबवले असून, नागरिकांनी गटाऱ्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.