
चेंबूर ते भक्ती मार्ग दरम्यान एक मोनो रेल आज सायंकाळी 6.15 वाजताच्या सुमारास बंद पडली आणि एका बाजूला झुकली होती. सव्वातासाच्या प्रयत्नांनंतर प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. दोन-तीन ठिकाणच्या काचा फोडून या प्रवाशांना मोनो रेलमधून बाहेर काढण्य
.
मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याचे मोनो रेल प्रशासनाकडून सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत, तीन स्नोर्केल वाहनांच्या मदतीने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले होते.
सव्वा तासाच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाकडून मोनो रेलच्या काचा फोडून आणि दरवाजा कापून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तीन शिड्यांच्या मदतीने या प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. या सर्व प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.
चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान धावणारी मोनोरेल म्हैसूर कॉलनी स्थानकाजवळ अचानक बंद पडल्याने प्रवाशी घाबरले होते. प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 196 या क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर एक दुसरी मोनोरेल मदतीसाठी दाखल झाली. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तीन स्नोर्केल वाहनांच्या साहाय्याने मदतकार्य सुरु केले.
मोनोरेलमधील एसी बंद, प्रवासी घामाघूम
मोनो रेल अधांतरी थांबल्यामुळे आतमध्ये असलेले एसी आणि दरवाजे दोन्ही बंद झाले होते. ज्यामुळे प्रवाशांची कुचंबणा झाली. प्रवाशी घामाघूम झाले, त्यांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. आधीच लोकल सेवेच्या खोळंब्यामुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांना आता मोनो रेलमधील या बिघाडामुळे आणखी एका त्रासाला सामोरे जावे लागले आहे.
वीज पुरवठ्यातील समस्येमुळे मोनो रेल अडकली
म्हैसूर कॉलनी स्थानकाजवळील एका मोनोरेल ट्रेनला वीज पुरवठ्यात किरकोळ समस्या आली आहे. आमचे ऑपरेशन आणि देखभाल पथक आधीच घटनास्थळी पोहोचले आहेत आणि ते लवकर सोडवण्यासाठी काम करत आहेत. सध्या, वडाळा आणि चेंबूर दरम्यानच्या सेवा एकाच मार्गावर सुरळीत सुरू आहेत. तुमच्या संयमाबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुमची सुरक्षितता आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे याची खात्री देतो. खात्री बाळगा, सामान्य सेवा लवकरात लवकर पूर्ववत केल्या जातील, असे एमएमआरडीएने सांगितले होते.
मोनो रेलच्या आतील फुटेज
एअर कंडिशनिंग बंद झाले असून, दरवाजे देखील बंद होते. त्यामुळे प्रवाशांना गुदमरल्याचा त्रास झाला. मोनो रेलमधील अडकलेले प्रवाशी बाहेरील अग्निशमन कर्मचाऱ्यांना हात जोडून बाहेर काढण्याची विनंती करत होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.