digital products downloads

मुंबईत मोनो रेल सेवा 20 सप्टेंबरपासून तात्पुरती बंद: तांत्रिक सुधारणेसाठी MMRDA चा निर्णय; 2 महिन्यांत तीनदा अडकली होती – Mumbai News

मुंबईत मोनो रेल सेवा 20 सप्टेंबरपासून तात्पुरती बंद:  तांत्रिक सुधारणेसाठी MMRDA चा निर्णय; 2 महिन्यांत तीनदा अडकली होती – Mumbai News


मुंबईकरांच्या प्रवासाला अधिक सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी (MMRDA) ने मुंबई मोनो रेल सेवा 20 सप्टेंबर 2025 पासून तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा तात्पुरता ‘ब्लॉक’ नवीन रोलिंग स्टॉक,

.

चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या दोन्ही दिशांमधील मोनो रेल सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार आहे. प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे, असे आवाहन एमएमआरडीएच्या वतीने करण्यात आले आहे.

एमएमआरडीएचे आयुक्त काय म्हणाले?

एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, “हा तात्पुरता ब्लॉक मोनो रेलचे पुनरुज्जीवन करण्यासाठी एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. नवीन गाड्या, अत्याधुनिक सीबीटीसी सिग्नलिंग आणि जुन्या गाड्यांची दुरुस्ती करून आम्ही ही प्रणाली अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि भविष्यासाठी सज्ज बनवत आहोत. आम्ही प्रवाशांच्या संयमाचे कौतुक करतो आणि खात्री देतो की जेव्हा मोनोरेल पुन्हा सुरू होईल, तेव्हा ती अधिक सामर्थ्याने आणि चांगल्या सेवेसह मुंबईकरांची सेवा करेल.”

सुरू असलेले प्रमुख बदल

आधुनिक सिग्नलिंग प्रणाली : हैदराबादमध्ये विकसित झालेली सीबीटीसी तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक प्रणाली प्रथमच मुंबई मोनोरेलमध्ये बसवली जात आहे.

इंटरलॉकिंग व उपकरणे : 32 ठिकाणी 5 इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग बसवले गेले असून चाचणी सुरू आहे. 260 वाय-फाय ऍक्सेस पॉईंट्स, 500 RFID टॅग्स, 90 ट्रेन डिटेक्शन सिस्टम्स व अनेक WATC युनिट्स बसवले गेले आहेत.

रेल्वे रेक्स : एमएमआरडीएकडून ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत १० नवे रेक्स मेधा (MEDHA) व एसएमएच रेल यांच्या सहकार्याने विकत घेतले आहेत.

या प्रणालीमुळे सुरक्षितता वाढणार, गाड्यांमधील अंतर कमी होणार आणि सेवा अधिक विश्वासार्ह होणार असल्याचे सांगितले जात आहे.

सेवा बंद ठेवणे का आवश्यक?

सध्या मोनो रेलची सेवा दररोज सकाळी 6.15 ते रात्री 11.30 पर्यंत सुरू असते. त्यामुळं फक्त रात्री 3.5 तासच इन्स्टॉलेशन व चाचणीसाठी वेळ उपलब्ध होतो. दरवेळी पॉवर रेल बंद करणे, डिस्चार्ज व रीचार्ज करण्याच्या प्रक्रियेमुळे गती मंदावते. सेवा बंद ठेवल्यामुळे अखंडपणे इन्स्टॉलेशन, कमिशनिंग आणि चाचणी करता येईल.

याचबरोबर जुन्या रेक्सचे ओव्हरहॉलिंग आणि रेट्रोफिटिंग होऊन तांत्रिक बिघाड पूर्णपणे टळणार आहे. आगामी मेट्रो प्रकल्पांसाठी मनुष्यबळ प्रशिक्षण व पुनर्विनियोजन करण्यासही ही विश्रांती उपयुक्त ठरणार आहे.

2 महिन्यांत तीनदा अडकली मोनो रेल

दरम्यान, मागील दोन महिन्यांत तांत्रिक बिघाडांमुळे मोनो रेल सेवा तीनवेळा अधांतरी अडकली होती. यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. या घटनांसंदर्भात एमएमआरडीएने चौकशी समिती नेमली असून, दीर्घकालीन विश्वासार्हतेसाठी सेवा तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp