
भारत हा एक विकसनशील देश आहे. भारताला सर्जनशील केंद्र आणि मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. भारतातील मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगलुरु, हैद्राबाद, चेन्नई, अहमदाबाद, पुणे, सुरत, विशाखापट्टणम यासारखे शहर ही श्रीमंत शहर म्हणून ओळखली जातात. महाराष्ट्रातील असंच एक शहर जे श्रीमंत परिसरासाठी चर्चेत आलं आहे.
शिक्षणाचे माहेरघर आणि सांस्कृतिक वारसा जपणारा महाराष्ट्रातील परिसर म्हणजे पुणे. पुणे शहर हे मेट्रो सिटी म्हणून ओळखले जाते. मुंबई प्रमाणेच पुण्यात देखील अनेक उच्चभ्रू परिसर आहेत. येथे गडगंज श्रीमंत व्यक्तींची वस्ती आहे.
महाराष्ट्रातील राजधान मुंबई हे पहिलं श्रीमंत शहर आहे तर पुणे हे दुसरं श्रीमंत शहर आहे. शिक्षण, संस्कृती आणि व्यापाराचे मुख्य केंद्र म्हणून पुणे ओळखले जाते. तसेच पुणे हे भारतीय आयटी हब म्हणूनही ओळखले जाते. अशावेळी आपण पुण्यातील श्रीमंत परिसरांची माहिती जाणार घेणार आहोत.
कोरेगाव पार्क
पुण्यातील श्रीमंत परिसरातील एक परिसर म्हणजे कोरेगाव पार्. जे पुणे शहराच्या पूर्वेकडे आहे. हे परिसर शहरातील केंद्राशी जोडला गेला आहे. या ठिकाणी शाळा, मॉल, हॉस्पिटल सारख्या सुविधा चांगल्या प्रकारे उपलब्ध आहेत.
कल्याणी नगर
कल्याणी नगर परिसर हा पुण्यातील दुसरा श्रीमंत परिसरापैकी एक आहे. येथे देखील श्रीमंत व्यक्तीमत्व जास्त राहतात. एवढंच नव्हे तर या एरियाला कर्मशियल देखील अधिक मागणी आहे. या शहारत मॉल, शिक्षण संस्था आणि हॉस्पिटल मोठ्या प्रमाणात आहे.
औंध
पुण्यातील औंध परिसरातील अनेक मान्यवर आणि दिग्गज मंडळी राहतात. महत्त्वाचं म्हणजे हा परिसर एअरपोर्टजवळ आहे . तसेच हा परिसर शहरातील इतर भागांशी देखील जोडला गेला आहे. तसेच येथे अनेक शिक्षण संस्था आहे.
मॉडल कॉलनी
मॉडल कॉलनी हा परिसर पुण्यातील पॉश एरिया म्हणून ओळखला जातो. या परिसरातून शहाराला चांगली कनेक्टिविटी आहे. या परिसरात शाळा, मॉल, रुग्णालये मोठ्या प्रमाणात आहे.
एनआयबीएम रोड
हा परिसर एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशनपासून जवळ आहे. या परिसरात अनेक व्हिला आणि उंच अपार्टमेंट आहे. येथून मगपट्टा, कोंढवा आणि कल्याणी नगर परिसराला चांगली कनेक्टिविटी आहे. हा डाटा मॅजिकब्रिक्स सारखा आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.