
Mumbai-Pune Expressway Challan: महाराष्ट्रातील सर्वात वर्दळीचा महामार्ग असलेल्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सर्वासामान्यांची खरोखरच लूट चालली आहे की काय असा प्रश्न पडण्यासारखी माहिती समोर आली आहे. राज्य परिवहन विभागाच्या इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सीस्टिम (आयटीएमएस) अंतर्गत मुंबई-पुणे महामार्गावर जुलै ते डिसेंबर 2024 या कालावधीत 18 लाख 25 हजार ई-चलान जारी करण्यात आले. त्यापैकी सहा लाख 24 हजार चलान चुकीचे असल्याचे वाहतूकदार के. व्ही. शेट्टी यांना माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या तपशीलात उघडकीस आले आहे. त्यामुळे ‘आयटीएमएस’च्या कार्यक्षमतेवर वाहनचालक आणि वाहतूकदार शंका उपस्थित करत आहेत.
चुकीच्या पद्धतीने कापलं जात चलान
अनेकदा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर चुकीच्या पद्धीतने चलान कापले जाते अशी वाहनचालकांची तक्रार असते. बऱ्याच ठिकाणी आवश्यकता नसल्याने वेगमर्यादा नियंत्रित ठेवण्यात आली असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून थेट वाहनक्रमांकाशी संलग्न मोबाईल क्रमांकावर चलान कापण्यात आल्याची माहिती मेसेजच्या माध्यमातून पुरवली जाते. या सर्व यंत्रणेमध्ये मानवी हस्तेक्षप नसल्याने नियम मोडलेला नसतानाही झालेलं चलान अनेकजण अधिक कुठे प्रकरण वाढवायचं असं म्हणत भरुन टाकतात. मात्र आता या अशा चलान कापण्याच्या पद्धतीमधील प्रत्येक 100 चलानांपैकी 34 चलान चुकीच्या पद्धतीने कापण्यात आल्याचं समोर आलं आहे. ही धक्कादायक माहिती सरकारनेच माहिती अधिकार अर्जाला दिलेल्या उत्तरात दिली आहे, हे विशेष!
100 कोटींपेक्षा अधिक खर्च
मुंबई-पुणे महामार्गावर जुलै 2024 पासून ‘आयटीएमएस’चा वापर सुरू झाला. राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) द्वारे आरटीओ आणि महामार्ग पोलिसांच्या सहकार्याने सार्वजनिक-खासगी भागीदारीतून हा प्रकल्प राबविला जात आहे. 100 कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या या प्रकल्पासाठी परिवहन विभागाने 45 कोटी दिले आहेत. ‘एमएसआरटीसी’ ने ‘आयटीएमएस’चा भाग म्हणून 40 गॅन्ट्री आणि शेकडो सीसीटीव्ही या महामार्गावर कॅमेरे बसवले आहेत
17 प्रकारच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास चलान
‘आयटीएमएस’मुळे महामार्गावरील अपघात रोखण्यास मदत झाली असली तरी, चुकीच्या ई-चलानची संख्या मोठी आहे. ओव्हर स्पीडिंग, सीटबेल्ट न लावणे, लेन कापणे, चुकीच्या बाजूने वाहन चालवणे आणि मोबाइलचा वापर यांसारख्या 17 प्रकारच्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनप्रकरणी ई-चलान जारी होतात. मात्र, ओव्हर स्पीडिंगव्यतिरिक्त इतर नियमांच्या उल्लंघनाबाबत अनेकवेळा चुकीचे चलान झाल्याने काही चलान रद्द केले आहेत.
असे आहेत सहा महिन्यांतील चलान
जारी केलेले – 12 लाख 579
रद्द – 6 लाख 24 हजार 569
दंड न भरलेले – 10 लाख 94 हजार 800
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.