digital products downloads

मुंबई-पुणे वाहतूक कोंडीत अडकलेल्यांना टोलचे पैसे परत मिळणार, तारीख जाहीर झाली; कधी येणार खात्यात पैसे?

मुंबई-पुणे वाहतूक कोंडीत अडकलेल्यांना टोलचे पैसे परत मिळणार, तारीख जाहीर झाली; कधी येणार खात्यात पैसे?

Mumbai To Pune: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अलीकडे घडलेल्या मोठ्या वाहतूक अडचणीमुळे हजारो प्रवाशांना तासन्‌तास अडकून राहावे लागले. प्रवास थांबलेला असतानाही अनेकांच्या फास्टॅग खात्यातून टोल कपात झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आणि वाहनचालकांमध्ये नाराजी वाढली. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रकरणाची दखल घेतली असून टोल परताव्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. संबंधित ठेकेदार कंपनीकडून माहिती मागवण्यात आली आहे. त्यामुळे आता अडकलेल्या वाहनधारकांना दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Add Zee News as a Preferred Source

वाहतूककोंडी नंतर MSRDC ची कारवाई
3 February रोजी पुणे-मुंबई Expressway वर भीषण ट्रॅफिक जॅम निर्माण झाला होता. अनेक वाहनं लांबच लांब रांगेत उभी राहिली होती आणि काही वेळेस मार्ग पूर्णपणे बंदही होता. या परिस्थितीतही काही वाहनचालकांच्या FASTag खात्यातून टोल वजा झाल्याच्या तक्रारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) कडे आल्या. या प्रकरणाची गंभीर दखल घेत MSRDC ने संबंधित ठेकेदार IRB कंपनीला नोटीस पाठवली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाहतूक थांबलेली असताना टोल आकारू नये, असे आधीच निर्देश देण्यात आले होते.

फास्टॅग कपात कशी झाली?
MSRDC च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बॅरियर बंद असतानाही काही व्यवहार नोंदले गेले असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षात वाहनं पुढे सरकत नसतानाही स्वयंचलित प्रणालीमुळे कपात झाली असण्याचा अंदाज आहे. या संदर्भात महामंडळाने IRB कडून तपशीलवार माहिती मागवली आहे. 5 February रोजी रात्री 1 वाजता मुंबईकडे जाणारा मार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.

MSRDC चे कार्यकारी अभियंता राकेश सोनवणे यांनी सांगितले की, 3 February रोजी वसूल झालेला टोल परत करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. सध्या अडकलेल्या वाहनांची संख्या आणि FASTag कपातीचा अचूक डेटा गोळा केला जात आहे. हा तपशील 2 ते 3 दिवसांत स्पष्ट होईल, असा दावा करण्यात आला आहे.

हे ही वाचा: महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक जाहीर! शरद पवार पुन्हा राज्यसभेवर? महायुतीला किती जागा?

परतावा कसा मिळणार?
महामंडळाकडे माहिती प्राप्त झाल्यानंतर संबंधित वाहनचालकांच्या FASTag खात्यातून वजा झालेली रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. वाहनचालकांना वेगळी अर्ज प्रक्रिया करावी लागणार नाही, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे ट्रॅफिक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे. आता अंतिम निर्णय जाहीर होण्याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp