digital products downloads

मुंबई महापालिकेला मिळणार पहिल्या महिला आयुक्त!: मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्याची वर्णी, अश्विनी भिडे यांचे नाव निश्चित – Mumbai News

मुंबई महापालिकेला मिळणार पहिल्या महिला आयुक्त!:  मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्याची वर्णी, अश्विनी भिडे यांचे नाव निश्चित – Mumbai News



देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या (BMC) आयुक्तपदाची धुरा आता पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याच्या खांद्यावर जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू आणि ‘मेट्रो वूमन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती निश्चित झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्यमान आयुक्त भूषण गगराणी हे ३१ मार्च रोजी निवृत्त होत असून, त्यांच्या जागी अश्विनी भिडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा मंगळवारी होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी सनदी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात मोठी चुरस पाहायला मिळाली. यामध्ये सेवाज्येष्ठतेनुसार मिलिंद म्हैसकर, असीम गुप्ता आणि संजय मुखर्जी यांची नावे चर्चेत होती. मात्र, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहणाऱ्या अश्विनी भिडे यांच्या प्रशासकीय कौशल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी विश्वास दर्शवल्याचे बोलले जात आहे. सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत भिडे यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. शिंदेंचा विरोध मावळला; रात्रीच्या बैठकीत तोडगा सुरुवातीला अश्विनी भिडे यांच्या नियुक्तीला नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, सोमवारी रात्री अश्विनी भिडे यांनी स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे एक तास चर्चा केली. या भेटीनंतर शिंदे यांचा विरोध मावळला असून प्रशासकीय स्तरावरील सर्व अडथळे दूर झाले असल्याचे समजते. ‘मेट्रो वूमन’ची नवी इनिंग १९९५ बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या अश्विनी भिडे यांनी मुंबई मेट्रो आणि कोस्टल रोड (किनारी रस्ता) सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या उभारणीत सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे त्यांना ‘मेट्रो वूमन’ म्हणून देखील ओळखले जाते. त्यांनी यापूर्वी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणूनही यशस्वी काम पाहिले आहे. कोस्टल रोड प्रकल्प पूर्णत्वाकडे नेणे आणि पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व मुंबईतील पायाभूत सुविधांचे नियोजन करणे, ही आव्हाने त्यांच्यासमोर असतील. महापालिकेची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एका महिला आयुक्ताची नियुक्ती होत आहे. विशेष म्हणजे, सध्या मुंबईच्या महापौरपदीही एका महिला लोकप्रतिनिधी विराजमान आहेत. त्यामुळे आशियातील या सर्वात मोठ्या महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत आणि प्रशासनात आता ‘महिला राज’ पाहायला मिळणार आहे. गेल्या काही काळापासून महापालिका प्रशासनावर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप धुवून काढून पारदर्शक कारभार करणे, हे अश्विनी भिडे यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान असेल.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp