digital products downloads

मुंबई लोकलमध्ये लवकरच मोठे बदल होणार; ‘या’ प्रवाशांना होणार फायदाच फायदा, कोर्टाने दिले होते आदेश

मुंबई लोकलमध्ये लवकरच मोठे बदल होणार; ‘या’ प्रवाशांना होणार फायदाच फायदा, कोर्टाने दिले होते आदेश

Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास सोप्पा व आरामदायी व्हावा म्हणून रेल्वे प्रशासनाकडून अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून लोकलमध्ये जेष्ठांचा डब्बा राखीव असावा अशी मागणी करण्यात येत होती. अखेर या मागणीवर सकारात्मक विचार करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वे लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिरिक्त सीट उपलब्ध करणार आहे. यासाठी 5.4 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. गाडीतील १ लगेज डबा ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष डब्यात रूपांतरित करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही व्यवस्था रेल्वेकडून करण्यात येत आहे.

लोकलमध्ये दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. ऑफिसच्या वेळेत गर्दी अधिक असते. अशावेळी अनेक जण जेष्ठ नागरिकांसाठी व दिव्यांगासाठी राखीव असलेल्या डब्यात चढतात. त्यामुळं जेष्ठांना या डब्यात चढचा येत नाही. दररोज विविध कारणांसाठी अनेक वृद्ध व्यक्ती लोकलने प्रवास करतात मात्र गर्दीच्या वेळी त्यांना प्रवास करण्यास अडचणी येतात. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने पश्चिम रेल्वेला तसे आदेश दिले होते. 

लोकल गाड्यांमध्ये दररोज सुमारे 50,000 ज्येष्ठ नागरिक प्रवास करत असून, रेल्वेने ज्येष्ठांना लोकलच्या लगेज डब्यातून प्रवास करण्याची परवानगी द्यावी, असा आदेश न्यायालयाने दिला होता. ज्येष्ठ नागरिकांसाठी समर्पित डब्यांची मागणी करणारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सध्या पश्चिम रेल्वेच्या लोकलध्ये 14 जागा ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव आहेत. चर्चगेट टोकापासून तिसऱ्या आणि 12 व्या कोचमध्ये या जागा राखीव आहेत.

परंतु, गर्दीच्या वेळी ज्येष्ठ नागरिकांना तेथपर्यंत पोहोचणे कठीण होते. त्यामुळे रेल्वे बोर्डाने सामानाच्या डब्याचे (चर्चगेट टोकापासून 7 वा कोच) समर्पित ज्येष्ठ नागरिक डब्यात रूपांतरास मान्यता दिली आहे. याची निविदादेखील जारी केली आहे. या डब्यामध्ये 13 प्रवाशांची बसण्याची क्षमता आणि 21 प्रवाशांसाठी उभे राहण्याची जागा असेल. सहजपणे चढ-उतार करता यावे, यासाठी स्वतंत्र प्रवेश आणि निर्गमन पॉइंट असतील. तथापि, इतर लगेज डबे कायम ठेवले जातील. हे काम टप्प्याटप्प्याने केले जाणार असून, एक वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. हे बदल 105 नॉन एसी ईएमयू रेकमध्ये केले जातील.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp