
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात अनेकदा मी सांगून सुद्धा कोणतेही कायदे निर्माण झालेले नाहीत. कायदा तयार करायला बजेटची गरज नाही, असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
.
उदयनराजे भोसले म्हणाले की, मुख्यमंत्री ऐकले पाहिजे म्हणण्यापेक्षा त्यांना कळाले पाहिजे ना, असे अवमान होत असेल तर सरकारच्या सगळ्यांना कळायला हवे. अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण? सत्ताधारी पक्षात असलो तरी किती वेळा सांगायचे एकदा सांगायचे बस, त्यानंतर त्यांना कळाले पाहिजे ना सर्वांना हे सगळे काय बोळ्यांने दुध पितात का सर्व जण असे म्हणत त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
शिवरायांनी सर्वधर्मसमभावचा संदेश दिला
उदयनराजे भोसले म्हणाले की, शिवरायांनी सर्वधर्मसमभाव हा संदेश दिला.सर्वांना एकत्र केले, एवढेच नाहीतर लोकांचा राज्यकारभारात सहभाग असावा अशी कल्पना मांडत लोकशाहीचा ढाचा रचला. लोकांना काय झाले हे समजत नाही, आपण कुणी देव पाहिला नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रुपाने आपल्याला देव पाहायला मिळाला. शिवराय, शंभुराजेंचा अवमान केला जातो आणि आपण तो सहन करणार का? शिवाजी महाराज यांच्यासारख्या युगपुरुषामुळे जे महापुरुष जन्माला आले त्यांच्या संरक्षण करण्यासाठी कायदे निर्माण झाले, मात्र शंभुराजे, शिवराय यांच्याविरोधात बोलणाऱ्यावर मकोकासारखी कारवाई झाली पाहिजे. अवमान करणाऱ्या व्यक्तीला 10 वर्षे शिक्षा झाली पाहिजे.
लोकप्रतिनिधी काय बोळ्याने दूध पितात का?
उदयनराजे भोसले म्हणाले की, अधिवेशन बोलवत जर कायदा केला नाही तर याचा अर्थ असा होईल की शिवाजी महाराज यांचा अवमान व्हावा ही त्यांची सर्वांची मनातून इच्छा आहे, मग लोकांनी त्यांना जागा दाखवून द्यावी. अवमान होतो तेव्हा यांना दिसत नाही का? ते काय बोळ्याने दूध पितात का? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.
वाघ्याच्या समाधीबाबत योग्य निर्णय घ्यावा
उदयनराजे भोसले म्हणाले की, दंगली होतात कुणाचे प्राण जातात त्याला कारणीभूत कोण आहे? कायदा पारित केला नाही तर हे सर्व ज त्यासाठी कारणीभूत असतील. हे सर्व काही सांगण्यासारखे नाही, हे मनातून आले पाहिजे. वाघ्या, वाघ्या सुरू आहे कोण आहे तो वाघ्या. एकच वाघ होऊन गेले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. वाघ्याच्या समाधीबद्दल अने जण आपल्या बुद्धीमत्तेचे प्रदर्शन करत आहे. काही जण म्हणताय होळकरांनी केले अरे काय संबंध, सरकारने इतिहासकारांची एक कमिटी बसवावी, ते तिथे का आहे, कधी आले इतिहासात त्यांची काय नोंद नाही पण काय असेल ते करा ना योग्य निर्णय घ्या असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.