
Rohit Pawar On Ajit Pawar Finance Department: ‘मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार’ हे राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले पद निर्माण करून मुख्यमंत्री फडणवीसांनी अजितदादांच्या अर्थखात्यात घुसखोरी केली आहे. असं रोहित पवार यांनी म्हटलंय. अजित पवारांच्या जामखेड दौ-यापूर्वीच रोहित पवारांनी काकांना चिमटे काढल्याची चर्चा सुरू आहे.
रोहित पवारांनी गंभीर आरोप करून महायुतीत खळबळ उडवून दिलीय. ‘मुख्यमंत्र्यांची दादांच्या अर्थ खात्यात घुसखोरी सुरू आहे, असा आरोप रोहित पवारांनी केलाय. मुख्यमंत्र्यांचं मुख्य आर्थिक सल्लागारपद निर्माण केलंय. हे राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेलं पद निर्माण करून एकप्रकारे अजितदादांच्या अर्थखात्यात देखील घुसखोरी केलीये असं रोहित पवार यांनी म्हंटलंय.
मुख्यमंत्र्यांनी ‘मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार’ हे राज्यमंत्रिपदाचा दर्जा असलेले पद निर्माण करून, एकप्रकारे अजितदादांच्या अर्थखात्यातही घुसखोरी केलेली आहे. यापुढे आता अजितदादांचा नंबर आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांचा नेहमीच एकाधिकारशाहीकडे कल राहिला असल्यानं त्यांनी प्रत्येक मंत्रालय प्रत्यक्ष-अपत्यक्षपणे आपल्या नियंत्रणात ठेवण्यावर भर दिला आहे.
राहिला प्रश्न मित्रपक्षांचा, तर भाजपच्या शब्दकोशात मित्रपक्ष म्हणजे केवळ ‘तात्पुरती सोय’ एवढाच अर्थ आहे. त्यामुळे गरज संपताच तात्पुरती सोय देखील संपवायची ही भाजपची कार्यपद्धती आहे.
भाजपची ही कूटनीती बाहेर राहून सर्वांना कळत असली तरी शिकार होणा-या मित्रपक्षांना शिकार होईपर्यंत कळत नाही हे मात्र मित्रपक्षांचं दुर्दैव म्हणावं लागेल. आमदार रोहित पवारांच्या या ट्विटवर भाजप नेते प्रवीण दरेकरांनी प्रतिक्रिया दिलीय. प्रत्येक विषयाकडे राजकीय दृष्टीनं पाहू नये असं दरेकर यांनी म्हटलंय.
शिव फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाला अजित पवार १७ एप्रिलला जामखेडला येणार आहेत. राम शिंदेंही त्यावेळी अजितदादांच्या सोबत असणार आहेत. विधानसभा निवडणुकीत जाणीवपूर्वक अजित पवारांनी कर्जत जामखेडला सभा घेतली नसल्याचा आरोप राम शिंदेंनी केला होता. आता आपल्या बालेकिल्ल्यात येण्याआधीच रोहित पवारांनी अजितदादांना चिमटे काढलेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.