
नाशिकमधील उद्योजक, व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निमा, आयमा, क्रेडाई आणि इंजिनिअरिंग क्लस्टर या अग्रणी संस्थांच्या अध्यक्षांनी ‘दिव्य मराठी’साठी घेतलेली मुख्यमंत्र्यांची मुलाखत. कुंभमेळा : रामायणामधील प्रसंगांचा भाविकांना मिळणार व्हर्च्युअल अ
.
मुख्यमंत्री : नाशिकचा महाकुंभ हा एआयचा उपयोग करून यशस्वी करण्यात येणार आहे. तो पर्यावरणपूरक मेळा असेल. प्रयागराजला पंधराशे हेक्टर जागा होती. आपल्याकडे ३०० एकर आहे. हे आव्हान आहे. या सगळ्या लोकांना योग्य एंगेज ठेवणे आवश्यक आहे. कुंभमेळ्यात होल्डिंग एरियासारख्या टेक्नॉलॉजीच्या शोकेस कराव्या लागतील .चांगल्याप्रकारे ते करू हे नक्की.
पण एआय कुंभ म्हणजे नेमके काय करणार ?
मुख्यमंत्री : एआयने लोकांना एंगेज ठेवता येईल. एआयचे ॲप्लिकेशन वापरुन व्हर्च्युअल रिॲलिटी, इमर्सिव्ह एक्सपिरिअन्स लोकांना देता येईल. जसे रामायणाचे प्रसंग इमर्सिव्ह एक्सपिरिअन्सद्वारे एआयने देता येतील. ते लोकांना आकर्षित करतील. लोकांना नाशिकची संस्कृती तसेच आपला इतिहास कळेल. एक वेगळा अनुभव मिळेल. महाकुंभाला प्रत्यक्ष उपस्थित नसणाऱ्यांनाही त्याचा आनंददायी अनुभव घेता येईल. लोकांना एंगेज ठेवण्यासाठी याचा फार मोठा उपयोग होईल. यानिमित्ताने गर्दीवरही नियंत्रण आणता येईल.
राज्यात उद्योगांपुढे विजेचा प्रश्न तीव्र आहे, तो कसा सोडवणार?
मुख्यमंत्री : विजेबाबत इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा आहे. अखंडित विजेसाठी एक लाख कोटींहून अधिक गंुतवणूक करणार आहे. खासगी व सरकारी यंत्रणांना सोबत घेऊन क्वॉलिटी पॉवर देण्याचा प्रयत्न करत आहोत. पॉवर ऑफ क्वॉलिटी आणि पॉवर आउटरेज ही दोन आव्हाने दूर करणार आहेत.
वीजपुरवठ्यात नेमक्या अडचणी काय ?
मुख्यमंत्री : सन २०२१, २०२२, २०२३ मध्ये २३ ते २४ हजार मेगावॅट विजेची मागणी होती. गेल्या दोन वर्षांत ३० हजार मेगावॅटपर्यंत ती गेली. दोन वर्षांत इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मोठा प्लांट रोलआउट केला आहे. वीज वितरणमध्ये एक लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक करतोय. ५० हजार कोटींची खासगी गुंतवणूक आणतो आहोत. दोन वर्षांत वितरणाच्या लाइन मी कम्लिटवर आणल्या. मुंबईमध्ये आधी एक लाइन गेली तर सर्व मुंबई फेल व्हायची आता तशी स्थिती नाही.
मुंबईतील वीजपुरवठा सुरळीत, इतर जिल्ह्यांचे काय ?
मुख्यमंत्री : नाशिक, पालघर, पुणे, रायगड या इंडस्ट्रियल क्लस्टरला कॅटर करू शकेल अशा आठ नवीन वीज वितरण लाइन आपण तयार करत आहोत. काम सुरूही केले आहे.महावितरणच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जवळपास ३० हजार कोटींची गुंतवणूक आपण सुरू केली आहे साधारणत: त्यासाठी दोन वर्षे लागतील. दोन वर्षांत आपण नक्कीच क्वॉलिटी पॉवर देऊ.
नाशिकसाठी डिफेन्स क्लस्टर, सुपर कनेक्टिव्हिटी नाशिकच्या पाेटेन्शिअलचा पुरेपूर फायदा करून घेणार : फडणवीस
‘दिव्य मराठी’च्या १४व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडले नाशिक विकासाचे व्हिजन
भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धानंतर भारतीय बनावटींच्या शस्त्रांमध्ये किंवा तंत्रज्ञानात जगाचा विश्वास माेठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये डिफेन्स क्लस्टरसाठी पाेटेन्शिअल असल्याने आपण नाशिकला डिफेन्स क्लस्टरच्या माध्यमातून जगाच्या पातळीवर आणण्याच्या दृष्टीने नियाेजन करत आहाेत. तसेच विमानतळाचा विस्तार कसा हाेईल यासाठीही प्राधान्याने प्रयत्न करत आहाेत. वाढवण बंदर हाेत असताना जाे रस्ता नाशिकशी जाेडला जाणार आहे. त्याचा नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला माेठा फायदा हाेणार आहे. सिन्नर इंटरचेंज नाशिकच्या जवळ कसा आणता येईल याचा अभ्यास करून त्यावरही काम करू असा संवाद मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधला. ‘दिव्य मराठी’च्या १४व्या वर्धापन दिनानिमित्त नाशिकच्या अग्रणी संस्थाप्रमुखांशी साधलेला हा विशेष संवाद…
एराेस्पेसच्या इकाे सिस्टिमचा डिफेन्स क्लस्टरसाठी फायदा

नाशिकच्या औद्याेगिक विकासाबाबत आपले व्हिजन काय?
मुख्यमंत्री : नाशिकमध्ये एचएएलमुळे एरोस्पेसमध्ये खूप चांगली इकोसिस्टीम आधीच आहे. आता विशेषत: भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धानंतर भारतीय बनावटींच्या शस्त्रांमध्ये किंवा तंत्रज्ञानात जगाचा विश्वास माेठ्या प्रमाणात वाढला आहे. आपल्याकडे आता ज्या गोष्टी आहेत त्यांना मागणी वाढली आहे, वाढणार आहे. दुसरीकडे इंडिजिनल रिलेशनचे आहे ते सुरूच आहे. त्यामुळे येत्या काळात आपण एक चांगले डिफेन्स क्लस्टर येथे उभे करू शकणार आहाेत. त्याचे नियाेजन सुरू आहे.
नाशिकची कनेक्टिव्हिटी कशी वाढू शकते.?
मुख्यमंत्री : पुढच्या दोन-तीन वर्षांत वाढवण बंदर आणि त्याच्या कनेक्टिव्हिटीचा नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यालाही खूप मोठा फायदा हाेणार आहे. याआधी दुर्देवाने जेएनपीटीचा जो नैसर्गिक फायदा नाशिकला मिळायला हवा होता तो मिळाला नाही. कारण कनेक्टिव्हिटीच नव्हती. आजही आपण बघितलं तर मुंबईशी नाशिकची कनेक्टिव्हिटी आता समृद्धीमुळे थोडी सुधारेल. पण तरीदेखील वाढवण बंदराशी जी कनेक्टिव्हिटी आपण नाशिकशी करताे आहाेत, ती ॲक्सेस कंट्रोल कनेक्टिव्हिटी असल्याने त्याला महत्त्व येणार आहे. नाशिकसाठी वाढवण बंदर ॲक्चुअल एक तासावर असेल म्हणजे ॲक्चुअल पॉकेट डेव्हलपमेंट आणि स्पेशल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठी ते आवश्यक असून फायदेशीर ठरेल. स्पेशल हॉर्टिकल्चर एक्सपोर्टमध्ये नाशिक इज व्हेरी गुड. त्यामुळे त्यादृष्टीने नाशिकला जे गाही देता येईल ते देण्याचा आपला प्रयत्न आहे. खर म्हणजे नाशिक हे फार पोटेन्शिअलचे शहर आहे. मात्र त्या क्षमतांचा फायदा ज्या प्रमाणात नाशिकला मिळायला हवा हाेता तसा आजपर्यंत मिळाला नाही हे वास्तव नाकारता येणार नाही. मात्र आता परिस्थिती बदलत आहे आणि ती मला दिसत आहे. जवळच्या भविष्यात सगळ्यांनाच दिसेल. फायदा असा- डिफेन्स क्लस्टर ठरणार गेम चेंजर
- डिफेन्स क्लस्टरमुळे नाशिक देशाच्याच नव्हे तर येणार जगाच्या पटलावर
- भारतीय शस्त्र आणि तंत्रज्ञानाला जगभरातून वाढेल मागणी
- स्थानिक राेजगारात माेठ्या प्रमाणात हाेणार वाढ
भाविकांच्या साेयीसाठी त्र्यंबकची इतर कुंडही कुशावर्ताला जाेडणार
महाकुंभाच्या प्रचारासाठी स्पिरिच्युअल गुरु, सेलिब्रेटींना ॲम्बेसेडर करणार का?
मुख्यमंत्री : त्याबाबत आपले काम सुरू झाले आहे. ती व्यवस्था आपण नक्कीच करत आहाेत. जसा कुंभमेळा जवळ येईल तसे ते काम हाेईल.
थेट घाटापर्यंत चाॅपरची साेय देणे नाशिक महाकुंभ मेळ्यात शक्य आहे का?
मुख्यमंत्री : तशी व्यवस्था नक्कीच ठेवणार आहोत. पण कुंभातील काही काळ पावसाचा आहे. हेलिकॉप्टरच्या सेवेबाबत आपण निश्चितच विचार करणार आहोत. तसे कामही सुरू आहे.
कुशावर्तावर हाेणारी गर्दी कशी हाताळता येईल. ?
मुख्यमंत्री : मागच्यावेळी त्र्यंबकला परिस्थिती कठीण झाली हाेती. त्यामुळे आता त्र्यंबकचे वेगवेगळे कुंड कुशावर्ताशी जोडू म्हणजे तिथे कुशावर्तचेच पाणी असेल. त्यासाठी साधूंशी संवाद सुरू असून सकारात्मक प्रयत्न हाेत आहेत. साधू-महंत मनाने खूप साधे आहेत. चांगल्या उपाययाेजनांचा विचार करुन त्यासाठी ते नक्कीच पाठिंबा देतात.
फायदा असा- आपत्कालीन घटना टाळता येण्यास मदत
- पर्वणी स्नानावेळी भाविकांच्या एकाच ठिकाण हाेणाऱ्या गर्दीवर मिळेल नियंत्रण
- याचवेळी इतर कुंडांचा विचार झाला तर पुढील कुंभमेळ्यांमध्येही त्याचा अधिक फायदा हाेईल.
- नाशिकलाही गोदावरीवरील विविध घाटांवर गर्दी विभागली जाईल.
साधूग्रामसाठी ५०% टीडीआर, ५०% रक्कम साधूग्रामचे भूसंपादन कसे करणार ?
मुख्यमंत्री : साधूग्राम हे ११ वर्षे प्रदर्शन केंद्र म्हणून वापरण्यात येईल तर कुंभमेळाच्या वर्षी ते साधूंसाठी असेल. याच्या संपादनासाठी जमीनधारकांनी ५० % टीडीआर घ्यावा व त्यांना ५० % रक्कम माेबदला म्हणून देऊ. भूसंपादनासाठी असा फाॅर्म्युला आहे.
साधूग्रामचा भाग तर ग्रीन झोन म्हणून नोटिफाय आहे. त्याच्या बाजूला यलो झोन आहे? मुख्यमंत्री : याची माहिती घेवून कार्यवाही करता येईल.
साधूग्रामला जर रेसिडेन्शिअलचा रेट देऊन, टीडीआर दिला केला तर जमीन सरकारला फ्री मिळेल? मुख्यमंत्री : यावरही प्राधान्याने विचार करताे.
फायदा असा-कायमचा वाद मिटेल
- कुंभमेळ्यानंतर ११ वर्षे पडून राहणाऱ्या जागेचा प्रदर्शन केंद्रामुळे हाेणार सदुपयाेग, उद्याेजकांचे पैसे वाचतील.
- जागा मालकांनाही माेबदल्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करावा लागणार नाही.
एअरपोर्टच्या इमिग्रेशन सेंटरबाबत केंद्राशी चर्चा
समृद्धीवर सिन्नर, इगतपुरीला ड्रॉपडाउन आहेत ते शहराजवळ आणता येतील का? मुख्यमंत्री : तुम्ही चांगले सुचवले आहे. कुंभमेळा आणि उद्याेगांच्या विकासासाठी त्याचा जरूर विचार करू. जेवढी जवळ कनेक्टिव्हिटी तेवढा जास्त फायदा होईल हे नक्कीच आहे. नाशिकजवळ समृद्धीला कनेक्टिव्हिटी देण्यासाठी तुम्ही पर्याय सुचवा. आम्ही नक्कीच त्याला मूर्त रूप देऊ.
ऑरिक सिटीसारखे नाशिकमध्ये काय वेगळे माॅडेल उभे राहू शकते?
मुख्यमंत्री : ऑरिक सिटीसारखं काहीतरी क्रिएट केले पाहिजे.नाशिकला आपण रतन इंडियाचा प्लांट विकत घेतला आहे. महाजनकोने तो मिळवला आहे. त्याचा उपयोग करून आपण चांगले काम उभे करू. विशेषत: डेटा सेंटरमध्ये अनइंटरप्टेड पॉवर लागते. त्याच्यासाठी याचा उपयोग करून घेता येईल. असा आमचा प्रयत्न आहे. चेन्नई-सुरत मार्ग आणि समृद्धी महामार्गाला सिन्नरला सुपर कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. भविष्यात बेस्ट प्लेस फॉर लॉजिस्टिक म्हणून सिन्नर डेव्हलप करणार आहोत. ते नाशिकच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल.
नाशिकच्या विमानतळाचा विस्तार, इमारत कधी हाेईल?
मुख्यमंत्री : एअरपोर्टबाबत डिफेन्सशी आपली चर्चा सुरू आहे. मात्र येथे पार्किंग वाढवावी लागेल. आमचा प्लॅन तयार आहे. कुंभमेळ्यामुळे येथील इमारतीचे काम वेगाने करणार आहोत. बोलणेही अंतिम टप्प्यात आहे. यासाठी किमान दीड वर्ष लागेल.
एअरपोर्टच्या इमिग्रेशन सेंटरचे काय? ते कधी सुरू हाेईल?
मुख्यमंत्री :एअरपोर्टच्या इमिग्रेशन सेंटरबाबत केंद्राशी निश्चित बोलता येईल. इमिग्रेशन चेक आऊटचे तुम्ही जे म्हणाला आहात तर नाशिकमधून केवळ हजसाठी विमानसेवेचाच फक्त विचार नाही तर ३६५ दिवस येथे ॲक्टिव्हिटी कशी सुरू राहील त्यासाठी आपले सर्व स्तरांतून निश्चितच प्रयत्न सुरू आहेत. नाशिक विमानतळाचा उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यासाठी उपयोग होतो. त्यामुळे येत्या काळात तुम्हाला नाशिक देशाच्या पटलावर एका वेगळ्या स्वरुपात दिसणार आहे.
फायदा असा- भविष्यात बेस्ट फाॅर लाॅजिस्टिक
- चेन्नई-सुरत मार्ग आणि समृद्धी महामार्गाला सिन्नरला सुपर कनेक्टिव्हिटी
- केवळ हजसाठीच नव्हेत तर ३६५ दिवस असेल विमानसेवा
- उद्याेगवाढीबराेबरच कार्गाेमुळे शेती क्षेत्राला हाेणार फायदा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.