
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज 100 दिवसांच्या कार्यक्रमाचा अंतरिम आढावा घेण्यात आला. 7 जानेवारी ते 16 एप्रिल 2025 या कालावधीत जी कामे झाली आहेत त्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली. य
.
या बैठकीला मंत्रालय सचिवांपासून ते क्षेत्रीय अधिकाऱ्यांपर्यंत 6854 अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते. ऑनलाईन बैठकीला सर्व स्तरातील इतके अधिकारी उपस्थित असण्याचा हा एक विक्रम, तालुका स्तरापर्यंत अधिकाऱ्यांचीही यावेळी उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
अधिकाऱ्यांना सूचना देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, नावीन्यपूर्ण उपक्रमांची यादी तयार करा, त्या इतरांनाही सांगा. गुंतवणूक येत असताना गुड गव्हरनन्स द्या, संकेतस्थळे फुलप्रूफ करा. संपूर्ण कालावधीचा आढावा आल्यानंतर 1 मे रोजी याचा सार्वजनिक कार्यक्रम करू असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. तसेच यावेळी चांगली कामगिरी करणाऱ्या 15 अधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.
महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर फडणवीस यांनी प्रत्येक खात्याला 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. या आराखड्यात लोक केंद्रीत योजना, तंत्रज्ञानाच्या उपयोगाने सहजतेने नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना, राज्याचे पुढारलेपण कायम ठेवत प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या कामगिरीचा समावेश असावा, असे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील 100 दिवसांच्या आराखड्यातून विभागांनी ठोस कामगिरी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच सरकारी योजनांची योग्य अंमलबजावणी करावी, अशा सूचना देखील फडणवीस यांनी या बैठकीत दिल्या आहेत.
या 15 अधिकाऱ्यांना देण्यात आली प्रमाणपत्रे
- पालघर पोलिस अधीक्षक : बाळासाहेब पाटील
- सातारा पोलिस अधीक्षक : समीर अस्लाम शेख
- संभाजीनगर आयजी : वीरेंद्र मिश्रा
- मुंबई पोलिस आयुक्त : विवेक फणसाळकर
- गृह, अतिरिक्त मुख्य सचिव: इकबालसिंग चहल
- आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका: शेखर सिंग
- आयुक्त, ठाणे महापालिका: सौरभ राव
- मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे, जिप: विशाल नारवाडे
- मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर, जिप: विवेक जॉन्सन
- जिल्हाधिकारी, नागपूर: विपीन इटनकर
- जिल्हाधिकारी, जळगाव: आयुष प्रसाद
- विभागीय आयुक्त, पुणे: डॉ. पुलकुंडवार
- आदिवासी आयुक्त: लिना बनसोडे
- आयुक्त वैद्यकीय शिक्षण: राजीव निवतकर
- सचिव, मृद व जलसंधारण: गणेश पाटील
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.