
महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान आणि आदिशक्ती पुरस्कार योजना सुरु करण्यास आज मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी चौंडी येथे ही बैठक पार पडली. या अभियानांतर्गत राज्य
.
राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविण्यात येत आहे. महिलांचे आरोग्याबाबत समस्यांचे संवेदनशीलपणे निवारण करणे, कुपोषण, बालमृत्यू, माता मृत्यूचे प्रमाण कमी करणे. मुलींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढवणे, लैंगिक आणि शारीरिक अत्याचाराला प्रतिबंध करणे, पंचायत राज पध्दतीत महिला नेतृत्वाचा सहभाग वाढविणे, महिलांना आर्थिक सक्षम करणे आदी या अभियानाची उद्दिष्टे आहेत.
राज्यभर प्रभावी जनजागृतीसाठी शासकीय योजना व उपक्रमांचा प्रचार विविध माध्यमांद्वारे केला जाणार आहे. ग्रामपातळीपासून राज्यस्तरापर्यंत विशेष समित्या स्थापन करण्यात येणार असून, या समित्यांचे वार्षिक मूल्यमापन केले जाईल. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समित्यांना “आदिशक्ती पुरस्कार” प्रदान करण्यात येईल. या पुरस्कारांचे वितरण मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.
या अभियानासाठी दरवर्षी सुमारे साडे दहा कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यास मंत्रिपरिषदेने मान्यता दिली आहे. राज्यस्तरावरील धोरणात्मक निर्णय महिला व बाल विकास मंत्री आदिती वरदा तटकरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मंजुरीनंतर राबविले जातील.
कुंभमेळा 2025 साठी प्राधिकरणाचा अध्यादेश
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याच्या अध्यादेशास मान्यता देण्यात आली. प्राचीन शास्त्रांनुसार नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे दर बारा वर्षांनी होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा लाखो भाविकांना आकर्षित करणारा आध्यात्मिक सोहळा आहे. या पर्वात देशभरातून तसेच परदेशातून कोट्यवधी भाविक, साधू-संत, विविध अखाडे, यात्रेकरू, पर्यटक आणि अभ्यासक सहभागी होतात. सन 2015 मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात सुमारे 2.5 कोटी भाविकांनी सहभाग घेतला होता. येत्या कुंभमेळ्यासाठी भाविकांची संख्या 4 ते 5 पट वाढण्याची शक्यता आहे. यामुळे या महाकाय धार्मिक उत्सवासाठी अत्यंत व्यापक व कार्यक्षम नियोजन, सुयोग्य समन्वय यांची आवश्यकता असल्याने त्यासाठी प्राधीकरणाची गरज होती. नुकताच प्रयागराज उत्तर प्रदेश येथे कुंभमेळा पार पडला. येथे नियंत्रण व समन्वयासाठी कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली होती. या प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्व भाविकांचे अतिशय उत्कृष्टरीत्या नियोजन करणे शक्य झाले. त्याच धर्तीवर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राधिकरणाबाबतच्या अध्यादेशास तसेच प्राधिकरणासाठी नवीन पदे तसेच प्रतिनियुक्तीने पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.